SBI मुलींसाठी 'खास' देत आहे 15 लाख रुपये, तुम्ही तिच्या लग्न-शिक्षणावर करु शकता खर्च

State Bank Of India : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने मुलींसाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 15 लाख रुपये मिळत आहेत. ही योजना तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा कुठेही शिक्षणासाठी वापरु शकता. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मुलींसाठी एक विशेष योजना चालवली जात असून, त्याअंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे.  

Surendra Gangan | Jun 07, 2023, 08:59 AM IST
1/5

SBI ने या नवीन योजनेची माहिती देताना म्हटले आहे की, बँक सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना पूर्ण 15 लाख रुपये देत आहे. हे पैसे तुम्ही शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरु शकता. 

2/5

बँकेने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने सांगितले की, मुलींना बँकेकडून सुकन्या समृद्धी योजनेची सुविधा दिली जात आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त 250 रुपये जमा करुन तुमच्या मुलीला करोडपती बनवू शकता. 

3/5

या सरकारी योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला हमी उत्पन्नाचा लाभ मिळतो. यासोबतच तुम्हाला कर सवलतीचाही लाभ मिळू शकतो. ही योजना खास मुलींसाठी आहे. मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून या योजनेची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. 

4/5

तसेच याशिवाय सरकार सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर 8 टक्के दराने व्याजाचा लाभ देत आहे. याशिवाय दोन मुलींसाठी तुम्ही ही योजना घेऊ शकता. दुसरीकडे पहिली मुलगी झाल्यानंतर आणखी दोन जुळ्या मुली असतील तर अशा स्थितीत तिन्ही मुलींना या सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे.

5/5

तुम्ही हे खाते जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी उघडू शकता. जर तुम्ही या योजनेचे हप्ते वेळेवर जमा केले नाहीत तर तुम्हाला 50 रुपये दंड भरावा लागेल.