थेट अमेरिकेला टक्कर देणारं महाराष्ट्रातील पहिलं पर्यटनस्थळ! 40 फूट उंचीवरील काचेच्या गॅलरीतून दिसतो 5 नद्यांचा अनोखा संगम

महाराष्ट्रात अमेरिकेप्रमाणे अनोखी काचेची गॅलरी उभारण्यात आली आहे.   

वनिता कांबळे | Jan 22, 2025, 20:49 PM IST

Ambhora Bridge  : आपल्या महाराष्ट्रात थेट अमेरिकेला टक्कर देणारी कलाकृती निर्माण करण्यात आली आहे. नदीवर एक केबल ब्रीज बांधण्यात आला आहे. या ब्रीजवर  40 फूट उंचीवर काचेची गॅलरी उभारण्यात आली आहे. या  गॅलरीतून 5 नद्यांचा अनोखा संगम पहायला मिळतो. जाणून घेऊया ही अनोखी कलाकृती कुठे उभारण्यात आली आहे. 

1/7

महाराष्ट्रात अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथील गोल्डन गेट च्या ब्रिजची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. 

2/7

दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा पूल नसल्यामुळे नागरिकांना बोटीच्या सहाय्यानं नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. या ब्रीजमुळे दोन्ही जिल्हे एकमेकांना कनेक्ट झाले आहेत.   

3/7

अंभोरा तीर्थक्षेत्र वैनगंगा, कन्हान, आम, मुर्झा, कोलारी या 5 नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. या ब्रीज आणि काचेच्या गॅलरीमुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे. 

4/7

40 फूट उंचीवर उभारण्यात आलेल्या काचेच्या गॅलरीमधून 5 नद्यांचा अनोखा संगम पहायला मिळतो.  

5/7

 या पुलावर स्काय गॅलरी तयार करण्यात आली आहे. तसेच, यावर चढण्यासाठी 40 फूट उंचीची लिफ्टही लावण्यात आली आहे.

6/7

जर्मन टेक्नॉलॉजीनं हा केबल स्टेड ब्रीज तयार करण्यात आला आहे. 

7/7

नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आंभोरा येथे हा अनोखा ब्रीज उभारण्यात आला आहे.