पुण्यातील सर्वात श्रीमंत एरिया, इंथ राहतात करोडपती; मुंबईसारखी हायप्रोफाईल लाईफस्टाईल

पुण्यातील सर्वात पॉश आणि श्रीमंत एरिया कोणते ते जाणून घेऊया.

वनिता कांबळे | Jan 22, 2025, 22:10 PM IST

Pune High Profile Area : शिक्षणाचे माहरेघर आणि सास्कृतिक वारसा जपणारे शहर अशी पुण्याची ओळख आहे. मात्र, पुणे शहर मेट्रो सिटी म्हणून ओळखले जाते. पोर्शे कार अपघातामुळे कल्याणी नगर हा पुण्यातील सर्वात पॉश परिसर असल्याचे समोर आले. मुंबई प्रमाणे पुण्यात देखील अनेक उच्चभ्रू परिसर आहेत. इथं अनेक श्रीमंत व्यक्ती राहतात.   अनेक शैक्षणिक संस्था, IT हब आणि बड्या कंपन्याचे युनिट यामुळे पुणे आता औद्योगिक शहर म्हणून देखील नावारुपाला येत आहे. 

 

1/8

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच मुंबई हे शहर महाराष्ट्रातीस पहिल्या क्रमांकांचे श्रीमंत शहर आहे. तर, पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकांचे श्रीमंत शहर आहे.    

2/8

हडपसर

हडपसर देखील पुण्यातील सर्वात पॉश परिसर म्हणून ओखळला जातो. पुणे स्टेशनपासून 8 km अंतरावर हा परिसर आहे.  अनेक श्रीमंत लोक येथे वास्तव्यास आहेत. 

3/8

हिंजवडी

हिंजवडी हे पुण्यातील IT हब म्हणून ओळखले जाते. अनेक बड्या कंपन्यांची कार्यालये येथे आहेत. यामुळे येथे देखील अनेक हायप्रोफाईल वसाहती आहेत. 

4/8

कोथरुड

कोरेगाव पार्क प्रमाणे कोथरुडला देखील चांगलीच डिमांड आहे. या परिसरात अनेक बंगले आहेत. अनेक श्रीमंत लोक येथे राहतात. 

5/8

कोरेगाव पार्क

कोरेगाव पार्क हा देखील पुण्यातील सर्वात पॉश परिसर आहे. येथे अनेक सेलिब्रीटी देखील राहतात.

6/8

शिवाजी नगर

शिवाजी नगर हा पुण्यातील सर्वात प्रसिद्ध परिसर आहे. शिवाजी नगर रेल्वे स्थानकामुळे या परिसात वाहतूक कनेक्टेव्हिटी खूप चांगली आहे. येथे अनेक हाय प्रोफाईल नागरी वसाहती आहेत. 

7/8

कल्याणी नगर

पोर्शे कार अपघातामुळे चर्चेत आलेल्या कल्याणी नगर हा पुण्यातील सर्वात पॉश परिसर आहे. पुण्यातील सर्वात महागड्या निवासी परिसरांपैकी एक आहे. या परिसरात अनेक श्रीमंत लोक राहतात. 

8/8

मुंबईच्या साऊथ बॉम्बेला पुण्यातील हे पॉश परिसर टक्कर देतात. या उच्चभ्रू एरियात अनेक करोडपची राहतात.