18 नोव्हेंबर 2024 ला सुरु झालेली रात्र संपली, दिवस उजाडला, जगातील आश्चर्यकारक ठिकाणी नवा सूर्योदय

जगातील या ठिकाणी 18 नोव्हेंबर 2024 ला सुरु झालेली प्रदीर्घ रात्र संपली आहे. 

वनिता कांबळे | Jan 22, 2025, 23:54 PM IST

Sunrise After  64 days In US town in Alaska : दिवस आणि रात्र या वेळापत्रकानुसारच संपूर्ण जग चालते. उगवत्या सूर्याबरोबर प्रत्येकजण उर्जेने कामाची सुरुवात करतात. दिवस मावळल्यावर रात्रीची वेळ ही विश्रांतीची असते. मात्र, जगात एक असे आश्चर्यकारक ठिकाण आहे जिथे दोन महिने दिवस आणि दोन महिने रात्र असते.  सध्य येथे सूर्यास्त झाला असून अंधार पडला आहे. म्हणजेच येथे रात्र सुरु झाली आहे. आता येथे थेट 22 जानेवारी 2025 ला सकाळ होणार आहे. 

1/7

 जगात एक असे ठिकाण जिथे लोक तब्बल दोन महिने रात्र अनुभवतात. येथे दोन महिने सूर्योदयच होत नाही. आता या ठिकाणी नवी पहाट झाली आहे.   64 दिवस फक्त रात्रच होती. या दरम्यान याचे दैंनदिन जीवन कसं असेल याची आपण कल्पनाही करु शकत नाही.    

2/7

 येथील अनोखा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात.  सूर्य हा प्रत्येकासाठीच ऊर्जेचा स्त्रोत आहे. मात्र, येथे राहणाऱ्यांना दोन महिने सूर्य दर्शन होत नाही.

3/7

अलास्का हे अमेरिकेच्या सर्वात उत्तर दिशेला आहे. पृथ्वीच्या झुकलेल्या अक्षामुळे इथं दिर्घ रात्र पाहायला मिळते.

4/7

 22 जानेवारी 2025 ला अलास्कामध्ये नवा सूर्योदय झाला आहे. म्हणजेच 64 दिवसांची प्रदिर्घ रात्र संपूण येथे दिवस उजाडला आहे. येथे नवी सकाळ झाली आहे. 

5/7

अलास्कामध्ये तब्बल 64 दिवस रात्र होती. जवळपास दोन महिने येथे सूर्योदयच झाला नाही.    

6/7

18 नोव्हेंबर 2024 ला येथे सूर्यास्त झाला आणि अंधार पडला. येथे दोन महिन्यांची प्रदीर्घ रात्र होती. 

7/7

अमेरिकेच्या अलास्कामध्ये  तब्बल दोन महिन्यांची प्रदिर्घ रात्र संपली आहे. इथं दिवस उजाडला आहे.