Mohammed Siraj: मोहम्मद सिराज दुसऱ्या टेस्टमधून का बाहेर? मोठी अपडेट अखेर समोर

Mohammed Siraj: विशाखापट्टणममध्ये दुसरा टेस्ट सामना सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आलं आहे.

Surabhi Jagdish | Feb 03, 2024, 10:19 AM IST
1/7

इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजला अचानक टीमबाहेर बसवण्याचा निर्यय घेण्यात आला.

2/7

दरम्यान मोहम्मद सिराजला का टीममधून वगळलं हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. 

3/7

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात वर्कलोड मॅनेजमेंटसाठी विश्रांती देण्यात आलीये. शुक्रवारी याबाबत घोषणा करण्यात आली आहे.

4/7

बीसीसीआयने यासंदर्भात प्रेस रिलीज जाहीर केलं असून त्यात नमूद केल्यानुसार, 'मोहम्मद सिराजला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टतून विश्रांती देण्यात आलीये. ही सिरीज मोठी असल्याने आणि अलीकडे तो भरपूर क्रिकेट खेळला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

5/7

याशिवाय राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठी तो उपलब्ध असणार आहे, असंही बीसीसीआयने म्हटलं आहे. 

6/7

दरम्यान टॉसच्या वेळी कर्णधार रोहित शर्माने सांगितलं होतं की, 'सिराजला विश्रांती देण्यात आलीये. जेणेकरून तो कुटुंबासोबत थोडा वेळ घालवू शकेल.

7/7

पहिल्या टेस्ट सामन्यात सिराजला चांगली कामगिरी करता आली नव्हती. दोन्ही डावांमध्ये त्याला एकंही विकेट घेता आली नाही.