रिक्षाचालकाचं नशीब फळफळलं! सैफने दिलेल्या बक्षिसाच्या दुप्पट पैसे देणार मिका; Insta स्टोरी पाहाच

Saif Ali Khan Stabbing Mika Singh Reward For Auto Driver Bhajan Singh Rana: सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याला रुग्णालयात पोहचवणाऱ्या रिक्षाचालकासाठी मिका सिंगमध्ये मोठी घोषणा केली आहे. तो नेमकं काय म्हणालाय जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Jan 23, 2025, 08:34 AM IST
1/12

mikasingh

मिका सिंगने इन्स्टाग्राम स्टोरीमधून या मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. नेमकं तो काय म्हणालाय आणि किती रक्कम या रिक्षाचालकाला देणार आहे जाणून घेऊयात...

2/12

mikasingh

गायक मिका सिंगने सैफ अली खानला जखमी अवस्थेत मदत करणारा रिक्षाचालक भजन सिंग राणासाठी मोठी घोषणा केली आहे. भजन सिंगने सैफ अली खानला वाचवल्याने खुश झालेल्या मिका मोठी रक्कम बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.   

3/12

mikasingh

16 जानेवारीच्या रात्री सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या वांद्र्यातील घराखाली भजन सिंग राणाच रिक्षा घेऊन आला होता. त्याने रक्तबंबाळ अवस्थेत सैफला रुग्णालयात पोहोचलवं. तसेच त्याने सैफकडून भाडंही घेतलं नाही.   

4/12

mikasingh

भजन सिंगने केलेल्या या मदतीची आठवण सैफनेही 21 तारखेला डिस्चार्ज होताना ठेवली आणि तो या रिक्षाचालकाला भेटला.  

5/12

mikasingh

सैफने अगदी भजन सिंगच्या गळ्यात घात घालून त्याच्याशी गप्पा मारल्या. सैफने भजन सिंगला त्या दिवशीचं भाडं देऊ असं सांगतानाच काहीही गरज लागली तर सांग मी मदत करायला तयार आहे, असं सांगितल्याचं आयएनएस वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.  

6/12

mikasingh

सैफने या भेटीदरम्यान भजन सिंग राणाला 50 हजार रुपयांचं बक्षिस दिलं. सैफची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनाही भजन सिंगचे आभार मानले.  

7/12

mikasingh

भजन सिंगने निस्वार्थ भावनेने केलेली मदत आणि त्याचं महत्त्व लक्षात घेत गायक मिका सिंगने त्याला सैफने केलेल्या मदतीपेक्षाही दुप्पट बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.  

8/12

mikasingh

"भारताच्या आवडत्या सुपरस्टारला वाचवण्यासाठी त्याला (रिक्षाचालक भजन सिंगला) किमान 11 लाख रुपये दिले पाहिजेत. त्याने केलेली कामगिरी खरोखर कौतुकास्पद आहे," असं मिकाने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीत म्हटलं आहे.  

9/12

mikasingh

"कोणाकडे त्याचा (भजन सिंगचा) नंबर असेल तर तो माझ्यासोबत शेअर करेल का? मला त्याला बक्षिस म्हणून 1 लाख रुपये द्यायचे आहेत," असंही मिकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत म्हटलं आहे.   

10/12

mikasingh

मिका सिंगने पोस्ट केलेली हीच ती इन्स्टाग्राम स्टोरी...

11/12

mikasingh

भजन सिंगने केलेल्या मदतीमुळे केवळ मिल्खाच प्रभावित झाला आहे असं नाही. काही दिवसांपूर्वी एका संस्थेनं भजन सिंगला 11 हजार रुपयाचं बक्षीस देत त्याचा सन्मान केला.  

12/12

mikasingh

अपघातानंतर भजन सिंगने वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जबाब नोंदवला होता. त्यावेळेस त्याने एएनआयशी बोलताना, त्या रात्री मदतीसाठी जाणं महत्त्वाचं असल्याने मी प्रवाशांकडून पैसे घेतले नाहीत. प्रवासी हा सैफ अली खान होता याची कल्पना नव्हती असंही भजन सिंग म्हणाला.