मुलींना इम्प्रेस करताना चुकूनही करु नका 'या' 4 गोष्टी, होणारं कामही बिघडेल

Relationship Tips: 

| Feb 02, 2024, 20:11 PM IST

Relationship Tips: मुलींसोबत मैत्री करावी असे अनेक मुलांना वाटते. कॉलेज, कामाच्या ठिकाणी तरुण-तरुणी एकत्र येतात. अशावेळी मैत्रीचं नातं निर्माण कसं करावं असा प्रश्न अनेक तरुणांना पडतो. मैत्री करण्यासाठी सर्वात आधी एकमेकांना ओळखावं लागतं. जोडीदाराच्या मनात आपल्याबद्दल चांगली प्रतिमा निर्माण करणे, हे महत्वाचे असते. काहीजण थेट जाऊन प्रपोजच करतात पण हे पाऊल खूपच चुकीचं ठरतं. अशाने मैत्रीचं नातंदेखील तुटण्याची शक्यता असते. 

1/9

मुलींना इम्प्रेस करताना चुकूनही करु नका 'या' 4 गोष्टी, होणारं कामही बिघडेल

How to Impress Girl Relationship tips

Relationship Tips: मुलींसोबत मैत्री करावी असे अनेक मुलांना वाटते. कॉलेज, कामाच्या ठिकाणी तरुण-तरुणी एकत्र येतात. अशावेळी मैत्रीचं नातं निर्माण कसं करावं असा प्रश्न अनेक तरुणांना पडतो. मैत्री करण्यासाठी सर्वात आधी एकमेकांना ओळखावं लागतं.

2/9

चांगली प्रतिमा

How to Impress Girl Relationship tips

जोडीदाराच्या मनात आपल्याबद्दल चांगली प्रतिमा निर्माण करणे, हे महत्वाचे असते. काहीजण थेट जाऊन प्रपोजच करतात पण हे पाऊल खूपच चुकीचं ठरतं. अशाने मैत्रीचं नातंदेखील तुटण्याची शक्यता असते. 

3/9

प्रपोज करण्याची इच्छा

How to Impress Girl Relationship tips

तुम्हालाही एखाद्या व्यक्ती आवडतेय आणि तिला प्रपोज करावे अशी तुमच्या मनात इच्छा आहे, तर काही कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. 

4/9

नात्यात दुरावा

How to Impress Girl Relationship tips

कारण तुमच्या तोंडून निघालेले काही शब्द तुमच्यातील नात्यात दुरावा निर्माण करु शकतात. यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. मुलीला इम्प्रेस करताना कोणत्या चुका करू नये? हे आधी समजून घेऊया.

5/9

व्यसन सोडा

How to Impress Girl Relationship tips

अनेक मुलांना सिगारेट, दारुचे व्यसन आहेत. त्यातही मुलींसमोर पर्सनालिटी दाखवण्यासाठी ते खुलेआम व्यसन करतात. हे मुलींना अजिबात आवडत नाही. तुम्ही तुमच्या नात्याबद्दल गंभीर असाल तर सर्वात आधी ही सवय सोडा. 

6/9

अर्वाच्च भाषा सोडा

How to Impress Girl Relationship tips

मुलांच्या बोलण्यात अनेकदा शिव्या असतात. मुलींसमोर शिव्या, अपशब्द किंवा अश्लील बोलल्यास इम्प्रेशन पडेल असे मुलांना वाटते. जे खूपच चुकीचे आहे. मुलींसमोर बोलताना तुमच्या भाषेवर नियंत्रण ठेवा. 

7/9

रागावर नियंत्रण ठेवा

How to Impress Girl Relationship tips

अनेक मुलांना स्वत:च्या रागावर नियंत्रण नसते. अशा मुलांना आपल्यासमोर कोण आहे? याचे भान राहत नाही. मुलींसमोर वाद घालणे, वरच्या भाषेत बोलणे याने तुमचे नाते बनणार नाही तर बिघडू शकते. 

8/9

फुशारक्या मारु नका

How to Impress Girl Relationship tips

काही मुले माझ्या वडिलांकडे इतकं आहे, आमच्या गावी असं आहे, आमचं अमकं तसं आहे, असे नेहमी सांगत असतात. मुलींना नेहमी कर्तुत्ववान मुलेच आवडतात. त्यामुळे फुकटच्या फुशारक्या मारणं आधी बंद करा. 

9/9

अस्वच्छ राहु नका

How to Impress Girl Relationship tips

मुलींना अस्वच्छ मुले अजिबात आवडत नाहीत. जर तुम्ही स्वतः घाणेरडे असाल किंवा तुमचे घर, खोली स्वच्छ नसेल तर मुलगी तुमच्याशी संबंध ठेवण्यास धजावणार नाही. त्यामुळे स्वच्छतेची आधी काळजी घ्या.