मलाही आली होती बिग बॉसची ऑफर, गौतमी पाटीलचा खुलासा, पण नकार देत म्हणाली, 'मी आधीपासूनच...'

नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमी तिच्या धडाकेबाज डान्सने चर्चेत असते. मात्र, आता गौतमी बिग बॉस मराठीची ऑफर नाकारल्याने चर्चेत आली आहे. काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

| Sep 05, 2024, 16:47 PM IST
1/6

चांगला प्रतिसाद

काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीच्या सीझन 5 ला सुरुवात झाली आहे. यंदाचा बिग बॉसचा शो तुफान चर्चेत आला आहे. प्रेक्षकांकडून शोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

2/6

सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरु होण्याआधी अनेक सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. 

3/6

नृत्यांगणा गौतमी पाटील

 बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनसाठी गौतमी पाटील हिला देखील ही ऑफर आली होती. मात्र, ही ऑफर गौतमीने नाकारली. 

4/6

बिग बॉस मराठीची ऑफर

अशातच गौतमी पाटील हिने टीव्ही 9 सोबत बोलताना असताना बिग बॉस मराठीच्या ऑफरवर प्रश्न विचारला असता तिने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

5/6

...म्हणून ऑफर नाकारली

गौतमी पाटील म्हणाली की, मला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनसाठी ऑफर आली होती. पण आधीच शो आणि कार्यक्रमांच्या तारखा अधिच बुक असल्यामुळे मी ती ऑफर नाकारली. 

6/6

भविष्यात बिग बॉसमध्ये जाणार

पुढे गौतमी म्हणाली की, यावेळी बिग बॉस मराठीमध्ये जाता आलं नाही पण भविष्यात बिग बॉसमध्ये नक्की जाईल असं यावेळी गौतमी पाटील म्हणाली.