तमन्ना विजय वर्मासोबत विवाहबंधनात अडकणार? मीडियाच्या प्रश्नावर अभिनेत्रीने सोडले मौन!

 बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या लव्ह लाईफमुळे सध्या खूपच चर्चेत आली आहे. तमन्ना एका अभिनेत्याला डेट करत आहे. लग्नाच्या प्रश्नावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. तिचं वक्तव्य सध्या खूपच व्हायरल होत आहे. 

| Sep 05, 2024, 15:39 PM IST
1/6

अभिनेत्री तमन्ना भाटिया

दक्षिण तसेच बॉलिवूडमधील अनेक भाषांमध्ये कलाकारांसोबत काम करणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. 

2/6

रोमँटिक फोटो

तमन्ना विजय वर्मासोबतच्या नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.  फॅशन शोमध्ये विजय वर्मासोबत अभिनेत्रीने रॅम्प वॉक केला आहे. दोघांचे एकत्र असणारे रोमँटिक फोटो देखील व्हायरल होत आहेत. 

3/6

चाहते उत्सुक

इतकच नाही तर दोघांनी सर्वांसमोर त्यांचे नाते देखील स्वीकारले आहे. सध्या दोघांच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ज्याबद्दल दोघांचे चाहते देखील खूप उत्सुक आहेत. 

4/6

आश्चर्याचा धक्का

विजय वर्माने देखील तमन्नासोबतच्या नात्याबद्दल मोनमोकळ्या पणाने सांगितले आहे. त्यानंतर आता नुकतेच तमन्ना भाटियाने देखील लग्नाबद्दल असे काही वक्तव्य केलं आहे ज्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

5/6

मौन सोडले

रिपोर्टनुसार, ती बुधवारी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान आली होती. त्यावेळी तिने लग्नाच्या प्रश्नावर आपले मौन सोडले. यावेळी तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. 

6/6

स्मितहास्य

विजय वर्मासोबतच्या तिच्या लग्नाच्या अफवांवर तिला मीडियाने प्रश्न विचारला असता त्यावर अभिनेत्रीने स्मितहास्य करत सध्या लग्नाबद्दल काहीच विचार केला नाही असं तिने म्हटले.