भारतातील जीवघेणा सिनेमा; ही कलाकृती साकारण्यास लागली दोन दशकं, Release आधीच अनेकांनी गमावले प्राण

  आज आपण बॉलिवूडमधील अतिशय खतरनाक अशा सिनेमाबद्दल जाणून घेणार आहोत. जो बनवण्यासाठी अनेकांनी अक्षरशः आपले प्राण गमावले. हा सिनेमा 1986 मध्ये रिलीज झाला होता. पण खास गोष्ट ही आहे की, हा सिनेमा तयार होण्यासाठी तब्बल 23 वर्षे लागली. अनेकांचे या दरम्यान मृत्यू झाले. 

| Jan 08, 2025, 11:41 AM IST

Most Sinister Movie:  आज आपण बॉलिवूडमधील अतिशय खतरनाक अशा सिनेमाबद्दल जाणून घेणार आहोत. जो बनवण्यासाठी अनेकांनी अक्षरशः आपले प्राण गमावले. हा सिनेमा 1986 मध्ये रिलीज झाला होता. पण खास गोष्ट ही आहे की, हा सिनेमा तयार होण्यासाठी तब्बल 23 वर्षे लागली. अनेकांचे या दरम्यान मृत्यू झाले. 

1/7

Most Sinister Movie:  आज आपण बॉलिवूडमधील अतिशय खतरनाक अशा सिनेमाबद्दल जाणून घेणार आहोत. जो बनवण्यासाठी अनेकांनी अक्षरशः आपले प्राण गमावले. हा सिनेमा 1986 मध्ये रिलीज झाला होता. पण खास गोष्ट ही आहे की, हा सिनेमा तयार होण्यासाठी तब्बल 23 वर्षे लागली. अनेकांचे या दरम्यान मृत्यू झाले. 

2/7

कोणता सिनेमा?

या सिनेमाचं प्रोडक्शन 1963 साली सुरु झालं होतं. मात्र अनेक संकटांमुळे हा सिनेमा तयार व्हायला वेळ लागला. 23 वर्षांनंतंर 1986 साली हा सिनेमा मोठ्या पडद्यावर उतरला. या सिनेमाचं नाव 'लव एँड गॉड' असं आहे. या सिनेमातील पात्र इतके लोकप्रिय झाले की, त्यांना लोक लैला मजून या नावानेच ओळखू लागली. 

3/7

मुख्य अभिनेत्याचा मृत्यू

हा चित्रपट लैला आणि मजनू यांच्या अरबी प्रेमकथेवर आधारित होता. चित्रपटात संजीव कुमार मजूनची भूमिका करत होते तर निम्मी लैलाची भूमिका साकारत होती. तसे या चित्रपटात संजीव कुमार दिसले होते. पण विकिपीडियानुसार आधी या चित्रपटात गुरु दत्त मुख्य भूमिकेत होते. पण शूटिंग सुरू होताच गुरु दत्त यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हा चित्रपट स्थगित करण्यात आला.

4/7

संजीव कुमार अभिनेता

यानंतर सिनेमाचे दिग्दर्शक के आसिफ यांनी गुरुदत्त यांच्या जागी संजीव कुमार यांना सिनेमात कास्ट केलं. 1970 साली सिनेमातील प्रोडक्शन सुरु केलं. 

5/7

दिग्दर्शकाने गमावले प्राण

मात्र 9 मार्च 1971 साली दिग्दर्शक के आसिफ यांचं निधन झालं. यानंतर सिनेमाने ब्रेक घेतला. यानंतर के आसिफ यांची पत्नी अख्तर आसिफ यांनी निर्माता आणि दिग्दर्शक यांची मदत घेऊन हा सिनेमा पूर्ण करुन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 

6/7

30 सिनेमानंतर झाला प्रदर्शित

ज्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित झाला. 27 मे 1986 रोजी. सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदर अभिनेता संजीव कुमार यांचा 1985 साली मृत्यू झाला.   

7/7

बॉलिवूडमधील प्रत्येक सिनेमाची एक गोष्ट असते. तसाच हा सिनेमा त्याच्या दिग्दर्शनाच्या काळामुळे चर्चेत आलं.