अवघ्या 8 तासांच्या प्रवासासाठी 44000 रुपयांचं तिकीट; तरीही या ट्रेननं जाण्यासाठी का बरं असते लांबलचक वेटींग लिस्ट?

Travel Railway Journey : असा कोणता प्रवास आहे जो प्रत्येकालाच करायचाय? असं खास आहे तरी काय? रेल्वेप्रवासाची सुरेख दृश्य पाहून तुम्हीही म्हणाल, ये कहाँ आ गये हम...   

Jan 08, 2025, 10:57 AM IST

प्रवास... काहीही कारणानं केलेला प्रवास असो, तो कायमच काही नवे अनुभव देऊन जाणारा असतो. 

1/7

रेल्वे प्रवास

Glacier Express journey photos train ticket rates

रेल्वे प्रवासादरम्यान, अनेकदा काही नवे अनुभव येतात की हे अनुभव खूप काही शिकवून जातात. अगदीच काही नाही, तर नव्या आठवणी देऊन जातात. असाच एक 8 तासांचा रेल्वेप्रवास आहे, जिथं तुम्ही 291 किमीचं अंतर ओलांडता. 

2/7

रेल्वेमार्ग

Glacier Express journey photos train ticket rates

हा एक असा रेल्वेमार्ग आहे, जो पर्वतरांगामधून वाट काढत पुढे जातो. शांत अशी टुमदार गावं इथं पाहता येतात, खोल दऱ्या धडकीही भरवतात. इथून जाणाऱ्या या रेल्वेचं नाव आहे ग्लेशियर एक्स्प्रेस. ही जगातील सर्वात धीम्या गतीनं धावणारी रेल्वेगाडी आहे असंही म्हटलं जातं.   

3/7

निसर्गरम्य दृश्य

Glacier Express journey photos train ticket rates

24 मैल इतकं अॅव्हरेज देणाऱ्या या रेल्वेप्रवासादरम्यान विविध निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो. शिवाय उंचावरून डोंगररांगांचं सौंदर्यही अनुभवता येतं. 91 बोगदो ओलांडत पुढे जाणारी ही ट्रेन, चार भागांमध्ये विभागली असून, प्रवासादरम्यान स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतशिखरांमधून ती पुढे मार्गस्थ होते. 

4/7

राईनचं खोरं

Glacier Express journey photos train ticket rates

रोने ग्लेशियर, ओबराल्प खोरं, कमाल वळण असणारा लँडवासर पूल आणि राईनचं खोरं अशा जागतिक दर्जाच्या अद्वितीय ठिकाणांची झलक या एका प्रवासात अनुभवता येते.   

5/7

ओबराल्पची दरी

Glacier Express journey photos train ticket rates

रेल्वेप्रवासातील प्रत्येक वळण जरी खास असलं तरीही ओबराल्पची दरी आणि खोरं हा या प्रवासातील एक असा टप्पा आहे जिथं रेल्वे आणि प्रवासी समुद्रसपाटीपासून सर्वाधिक अर्थात 2033 मीटर इतक्या उंचीवर असतात. 

6/7

आरामदायी आसनव्यवस्था

Glacier Express journey photos train ticket rates

प्रवाशांसाठी आरामदायी आसनव्यवस्था, चवीष्ट जेवण अशा एक ना अनेक सुविधा इथं पुरवण्यात येतात. प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी आणखी काय हवं? नाही का... या रेल्वेच्या एक्सिलेन्स क्लासमध्ये मिळणाऱ्या सुविधांना कशाचीच तोड नाही. 

7/7

तुम्ही कधी जाताय या प्रवासाला?

Glacier Express journey photos train ticket rates

या रेल्वे प्रवासाच्या तिकीटाची किंमत 470 स्विस फ्रँक असून, भारतीय चलनानुसार ही किंमत आहे 44350 रुपये. बरं आश्चर्याची बाब म्हणजे तिकीट इतकं महाग असतानाही हा प्रवास करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची वेटिंग लिस्टही तितकीच मोठी आहे. मग.... तुम्ही कधी जाताय या प्रवासाला?