कोण आहे अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी? संपत्तीचा आकडा ऐकून पुष्पाच्या फॅन्सलाही फुटेल घाम

Allu Arjun Wife Sneha Shetty : 'पुष्पा 2' चित्रपटामुळे संपूर्ण देशभरात चर्चेत असलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला (Allu Arjun)  शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली. अल्लू अर्जूनला सकाळी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या तसेच त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला अंतरिम जामीन सुद्धा मंजूर झाला आणि शनिवारी सकाळी तो तुरुंगातून बाहेर आला. दरम्यान अल्लू अर्जुनची पत्नी ही याप्रसंगी खूप भावुक झाली होती. 

| Dec 14, 2024, 16:26 PM IST
1/7

शुक्रवारी 13 डिसेंबरच्या सकाळीच अल्लू अर्जुनला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केलं. अभिनेत्याच्या सांगण्यानुसार पोलीस थेट त्याच्या बेडरूममध्ये घुसले आणि त्याला नाश्ता करण्याची संधी देखील दिली नाही. यावेळी पोलीस पकडून घेऊन जात असताना अल्लू अर्जुनने त्याची पत्नी स्नेहाला Kiss केले. 

2/7

पोलिसांची अटक, न्यायालयाने 14 दिवसांच्या कोथिडीची ठोठावलेली शिक्षा आणि नंतर मिळालेला अंतरिम जामीन या प्रक्रियेमुले अल्लू अर्जुनला रात्र तुरुंगातच काढावी लागली. सकाळी अल्लू अर्जुन जामिनावर बाहेर आल्यावर त्याची पत्नी स्नेहाने त्याला मिठी मारली. यावेळी अल्लूची पत्नी खूप भावुक झालेली दिसली.    

3/7

अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याच्या सिनेमांबद्दल तर त्याच्या चाहत्यांना ठाऊक आहे. पण त्याची पत्नी स्नेहा शेट्टी हिच्याबद्दल अनेकांना माहित नसेल. जिथे अल्लू अर्जुन चित्रपट सृष्टीतील एक मोठं नाव आहे तिथे स्नेहा ही इंटरनेटवरील लोकप्रिय पर्सनॅलिटी आहे. 

4/7

 स्नेहा आणि अल्लू अर्जुन यांची पहिली भेट ही एका लग्नात झाली होती. यावेळी स्नेहाला पाहून अल्लू अर्जुन तिच्या प्रेमात पडला होता. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढली आणि 2011 मध्ये दोघांचं लग्न झालं आणि आता त्यांना दोन मुलं देखील आहेत.   

5/7

स्नेहा शेट्टी ही एक यशस्वी व्यावसायिका देखील असून तिने शैक्षणिक आणि टेक्नोलॉजी क्षेत्रात खूप नाव कमावलं. तिच्या व्यवसायामुळेच तिने आज कोट्यवधींचा कारभार उभा केला आहे.   

6/7

स्नेहा शेट्टीची एकूण संपत्ती ही जवळपास 42 कोटींची आहे. इंटरनेटवरील लोकप्रिय पर्सनॅलिटी असण्यासोबतच स्नेहा ‘स्‍टूड‍ियो प‍िकाबू’ नावाचा व्यवसाय सुद्धा चालवते. हा एक ऑनलाइन फोटोस्‍टूड‍िओ आहे. 

7/7

स्नेहा शेट्टी ही हैदराबाद येथील मोठ्या कुटुंबातील असून तिचे वडील कंचरला चंद्रशेखर रेड्डी हे हैदराबादच्या साइंट‍िस्‍ट इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे चेअरमन आहेत. त्यांनी काहीच महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षात देखील प्रवेश केला आहे.