दिल्लीत क्रिकेटरच्या घरी रिंकू-प्रियाची पहिली भेट; 'अशी' सुरु झाली क्रिकेटर-खासदारची LoveStory!

क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचं लग्न ठरलं आहे. 

| Jan 19, 2025, 17:54 PM IST

Rinku Singh and Priya Saroj Love Story:क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचं लग्न ठरलं आहे. 

1/12

दिल्लीत क्रिकेटरच्या घरी रिंकू-प्रियाची पहिली भेट; 'अशी' सुरु झाली क्रिकेटर-खासदारची LoveStory!

Cricketers Rinku Singh and MP Priya Saroj Love Story Engagement Wedding Details

Rinku Singh and Priya Saroj Love Story: क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचं लग्न ठरलं आहे. प्रियाचे वडील आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या तूफानी सरोज यांनी त्यांच्या मुलीचे रिंकूसोबतच्या नात्याला दुजोरा दिला आहे.

2/12

पहिल्यांदा कसे भेटले?

Cricketers Rinku Singh and MP Priya Saroj Love Story Engagement Wedding Details

रिंकू-सरोज दोघांचेही लग्न ठरले आहे. रिंकू आणि प्रिया पहिल्यांदा कसे भेटले? त्यांची प्रेमकथा कशी सुरु झाली? याबद्दल सर्वकाही जाणून घ्या.

3/12

लवकरच लग्नबंधनात

Cricketers Rinku Singh and MP Priya Saroj Love Story Engagement Wedding Details

टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग लवकरच खासदार प्रियासोबत लग्न करणार आहे. या दोघांची पहिली भेट दिल्लीत एका क्रिकेटरच्या घरी झाली. बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नसेल.

4/12

क्रिकेटर आणि राजकारणी

Cricketers Rinku Singh and MP Priya Saroj Love Story Engagement Wedding Details

बॉलीवूड आणि क्रिकेट क्षेत्रातील जोड्या तुम्ही याआधी पाहिल्या असतील. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी सुखाने संसार करतेय. आता यामध्ये क्रिकेटर आणि राजकारणी अशी एक जोडी पाहायला मिळणार आहे.

5/12

रिंकू आणि प्रियाची ओळख

Cricketers Rinku Singh and MP Priya Saroj Love Story Engagement Wedding Details

रिंकू आणि प्रियाच्या लव्हस्टोरीबद्दल तूफानी सरोज यांनी स्वतः मीडियाला माहिती दिली. प्रियाच्या एका मैत्रिणीचे वडील क्रिकेटपटू आहेत. जे रिंकू सिंगला देखील ओळखत होते. त्याच्या माध्यमातूनच रिंकू आणि प्रियाची ओळख झाली.

6/12

मैत्रिणीचे वडील क्रिकेटपटू

Cricketers Rinku Singh and MP Priya Saroj Love Story Engagement Wedding Details

तूफानी सरोज नुकतेच रिंकूच्या मूळ गावी अलिगडला गेले होते. प्रियाच्या एका मैत्रिणीचे वडील क्रिकेटपटू आहेत. रिंकू सिंग त्याला ओळखत होता आणि त्यांच्या घरीही येत असे. त्यांच्या माध्यमातूनच दोघांची पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांनी बोलणे सुरू केले.

7/12

काही काळापासून एकमेकांच्या संपर्कात

Cricketers Rinku Singh and MP Priya Saroj Love Story Engagement Wedding Details

तूफानी सरोज यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, प्रिया आणि रिंकू गेल्या काही काळापासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा पुढे गेल्या आहेत. रिंकूच्या कुटुंबाने प्रियाच्या वडिलांना लग्नाचा प्रस्ताव दिला. मग यावर विचार केल्यानंतर त्यांना  होकार कळवल्याचे त्यांनी सांगितले.

8/12

दोघेही व्यस्त

Cricketers Rinku Singh and MP Priya Saroj Love Story Engagement Wedding Details

2024 मध्ये खासदार झालेल्या प्रिया सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यस्त आहेत. तर रिंकू इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिका खेळण्यात व्यस्त असेल. म्हणजे दोघांकडेही सध्या वेळ कमी आहे. त्यामुळे ते सध्या थांबवल्याचे प्रियाच्या वडिलांनी सांगितले.

9/12

अधिवेशन संपल्यानंतर

Cricketers Rinku Singh and MP Priya Saroj Love Story Engagement Wedding Details

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर दोघांनाही वेळ मिळताच सर्वात आधी साखरपुडा आणि नंतर लग्न होईल. हे दोन्ही कार्यक्रम लखनौमध्ये होणार आहेत.

10/12

जौनपूर आणि अलीगढ या दोन शहरांमध्ये स्वागत

Cricketers Rinku Singh and MP Priya Saroj Love Story Engagement Wedding Details

यानंतर जौनपूर आणि अलीगढ या दोन शहरांमध्ये स्वागत समारंभ होईल. या दरम्यान, क्रिकेट आणि राजकारणातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

11/12

प्रिया सरोजची संपत्ती

Cricketers Rinku Singh and MP Priya Saroj Love Story Engagement Wedding Details

प्रिया सरोजने प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार तिची एकूण मालमत्ता सुमारे 11.25 लाख रुपये आहे. ज्यापैकी बहुतेक रक्कम बँक ठेवींच्या स्वरूपात आहे. तिच्याकडे मोठे घर किंवा आलिशान कार नाही. राजकारणात आल्यानंतर ती साधे जीवन जगतेय.

12/12

रिंकूची संपत्ती

Cricketers Rinku Singh and MP Priya Saroj Love Story Engagement Wedding Details

2023 च्या आयपीएल हंगामात रिंकू सिंगने उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या टीमला विजयाकडे नेले. त्याच्या फलंदाजी आणि सामना फिनिशिंग कौशल्यामुळे तो एक महत्त्वाचा खेळाडू बनला. मीडिया रिपोर्ट्सनुसार 2024 मध्ये रिंकू सिंगची एकूण मालमत्ता सुमारे 8 कोटी रुपये होती. यावर्षी केकेआरने त्याला 13 कोटी रुपयांत कायम ठेवले आहे.