माकडाला का माहिती नसते आल्याची चव? या मागील रहस्य तुम्हाला आश्चर्यचकित करेल

Monkey and Ginger :  बंदर नहीं जानता अदरक का स्वाद, हिंदीमधील ही म्हणे खूप प्रसिद्ध आहे. या म्हणी मागील अर्था साधारण अज्ञानी माणसाला कशाचेही ज्ञान किंवा महत्त्व नसते. पण तुम्हाला या म्हणी मागील रहस्य माहितीये का?

| Dec 14, 2024, 17:31 PM IST
1/10

हिवाळ्यात थंडी वाढते अशावेळी आयुर्वैदात आल्याला अतिशय गुणकारी मानलं गेलं. आल्याचा चहा, काढा हा थंडीचा दिवसात खूप फायदेशीर मानला जातो. थंडीमुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्यांपासून मिळतो. 

2/10

मानवाला आल्याची चव कळते पण माकडांना आल्याची चव कळत नाही, अशी एक म्हण आहे. हा प्रचलित वाक्प्रचार आपण आपल्या दैनंदिन संभाषणात अनेकदा ऐकतो, याचा अर्थ असा होतो की अज्ञानी लोक सद्गुणांनी भरलेल्या गोष्टींची कदर करत नाहीत.

3/10

पण या म्हणीमागील कथा तुम्हाला माहितीये का? माणसांप्रमाणे आलं माकड खाऊ शकतं नाही. कारण माकडे काही खाण्यापूर्वी त्याचा सुंगध घेतात. आल्याचा वास घेतल्यानंतर ते लगेचच फेकून देतात. 

4/10

विशेष म्हणजे शाकाहारी प्राणी असलेल्या माकडांना सर्व प्रकारच्या वनस्पती ओळखता येतात. मात्र आल्याचे गुणधर्म ओळखण्याची क्षमता त्यांच्यात नसते. आल्याची चव ओळखण्याची क्षमता माणसांमध्ये आहे, पण माकडांमध्ये नाही.

5/10

शरीरासाठी खूप फायदेशीर असलेल्या आल्याचे स्वरूप आणि चव इतर भाज्या किंवा फळांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. आल्याचा सुगंध केवळ चहा किंवा पदार्थांची चव वाढवत नाही तर ते फायदेशीर देखील बनवते. त्याचप्रमाणे आले भाज्यांची चव वाढवते.

6/10

आल्यामध्ये अनेक पोषक घटक असतात आणि म्हणूनच आयुर्वेदात आल्याला अमृत मानलं गेलंय. आल्यामध्ये कॅल्शियम, लोह आणि इतर खनिजे असतात.

7/10

आलं खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. उलट्या होत असल्यास आले खाल्ल्याने आराम मिळतो. आले खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.  

8/10

आले खाल्ल्याने थकवा दूर होतो आणि इन्फेक्शनशी लढण्यासही मदत होते. तज्ज्ञांच्या मते, आले खाल्ल्याने हृदयाशी संबंधित समस्यांची शक्यता कमी होते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.

9/10

आयुर्वेदानुसार खोकला अनेक दिवस सोडत नसेल तर आल्याचा चहा किंवा आल्याचा मीठ घालून चाटल्याने घशाला आराम मिळतो.

10/10

मासिक पाळीच्या वेदनांनी त्रस्त असलेल्या मुलींना गरम पाण्यात किंवा चहासोबत आल्याचे सेवन केल्याने वेदना कमी होतात. सर्दी आणि खोकल्यावरही आले रामबाण औषध मानले जाते.