Virender Sehwag Net Worth : वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती किती, घटस्फोट झाल्यास आरतीला किती मिळणार पैसे?

Virender Sehwag Net Worth : भारतीय संघाचा माजी अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची सध्या चर्चेचा होतेय. 20 वर्षाचा संसारानंतर वीरेंद्र पत्नी आरतीला घटस्फोट देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता चाहत्यांचा प्रश्न आहे की वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती किती आहे आणि घटस्फोट झाल्यास आरतीला किती पोटगी द्यावी लागेल?

नेहा चौधरी | Jan 24, 2025, 11:34 AM IST
1/7

वीरेंद्र सेहवागने 2004 मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण आरतीशी लव्ह मॅरेज केलंय. या दोघांना दोन मुलं आहेत. पण आता या जोडप्याने संसाराच्या 20 वर्षांनंतर एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या समोर येत आहे. अशा परिस्थितीत जर दोघांमध्ये घटस्फोट झाला तर वीरेंद्र सेहवागला आरतीला पोटगी म्हणून किती पैसे द्यावे लागतील आणि क्रिकेटमधून निवृत्त झालेला सेहवाग कुठून पैसा कमावतोय याबद्दल जाणून घेऊयात.   

2/7

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती सुमारे 42 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 350 कोटींच्या घरात आहे. त्याची सर्वात मोठी कमाई बीसीसीआयचा पगारातून होते. याशिवाय तो आयपीएल करार आणि वैयक्तिक व्यवसायातूनही भरपूर कमाई करतो.   

3/7

क्रिकेटचं मैदाना गाजवल्यानंतर आता सेहवाग समालोचकाच्या भूमिकेत दिसतो. त्यातूनही त्याची भरपूर कमाई होते. यासह सेहवाग महिन्याला 2 कोटींहून अधिक कमावतो. तर त्याची वार्षिक कमाई 30 कोटींहून अधिक आहे.  

4/7

याशिवाय वीरेंद्र सेहवागही जाहिरातीतून चांगली कमाई करतो. विशेषत: तो टीव्हीवर बूस्ट, सॅमसंग मोबाईल, आदिदास, रिबॉक आणि हिरो होंडा सारख्या मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातून दिसतो.   

5/7

तर वीरेंद्र सेहवागकडे एक एंडोर्समेंट कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्यातून तो वर्षाला अंदाजे 3 लाख 50 हजार डॉलर्स कमावतो. तर जाहिरातींमधून त्याचे उत्पन्न 40 लाख रुपये आहे. याशिवाय तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडिया साइट X (पूर्वीचे ट्विट) वरून जवळपास $3 दशलक्ष कमावते.  

6/7

वीरेंद्र सेहवागने हरियाणामध्ये सेहवाग इंटरनॅशनल नावाची शाळा स्थापन केली आहे. या शाळेतूनही त्यांना पैसे मिळतात. हा देखील त्यांच्या निव्वळ संपत्तीचा एक भाग आहे, ज्यातून ते त्यांचे उत्पन्न मिळतात. 

7/7

आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर वीरेंद्र सेहवागने त्याची पत्नी आरतीला घटस्फोट दिला तर आरतीला पोटगी म्हणून किती पैसे द्यावे लागणार आहे. दोघांचा घटस्फोट होत असल्याची अद्याप पुष्टी झालेली नसली तरी या बातमीनंतर पोटगीही चर्चेत मात्र सुरु झाली आहे. त्यामुळे सेहवाग किती पोटगी देणार आहे याबाबत कोणतीही बातमी माहिती समोर आलेली नाही. पण नियमांनुसार त्याला त्याच्या संपत्तीतील काही हिस्सा पत्नीला द्यावा लागणार आहे.