'या' चित्रपटाच्या तिन्ही सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, चौथा भागही ठरू शकतो सुपरहिट

बॉलिवूडच्या या चित्रपटाचे तिन्ही सिक्वेल बॉक्स ऑफिसवर ठरले होते सुपरहिट. केली होती जबरदस्त कमाई. 10 वर्षांमध्ये तीनदा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या चौथ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Soneshwar Patil | Jan 23, 2025, 19:50 PM IST
1/7

21 वर्षांपूर्वीचा चित्रपट

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांचे सिक्वेल देखील सुपरहिट झालेत. यामध्ये 21 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. 

2/7

चित्रपटाचे सिक्वेल

या चित्रपटाची कथा आणि गाणी पाहिल्यावर प्रत्येक जण उठून टाळ्या वाजवू लागला होता. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाचा दुसरा आणि तिसरा सिक्वेल आणला.   

3/7

धूम

अशातच आता निर्माते या चित्रपटाचा चौथा भाग आणणार आहेत, ज्याची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे नाव 'धूम' आहे. 

4/7

कलाकार

2004 साली प्रदर्शित झालेला हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, ईशा देओल, रिमी सेन आणि उदय चोप्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते.

5/7

कमाई

या चित्रपटाचे बजेट 11 कोटी रुपये होते. या चित्रपटाने जगभरात 50 कोटींहून अधिक कमाई केली होती. 'धूम' चित्रपटाच्या यशानंतर, निर्मात्यांनी 2006 मध्ये 'धूम 2' रिलीज केला. त्यानंतर 2013 मध्ये 'धूम 3' चित्रपट प्रदर्शित झाला. 

6/7

धूम 4

'धूम 3' रिलीज झाल्यानंतर चाहते 'धूम 4'ची वाट पाहत आहेत. अलीकडेच 'धूम 4' च्या खलनायकाबाबत एक अपडेट समोर आले आहे.   

7/7

रणबीर कपूर

रणबीर कपूर 'धूम 4' चित्रपटाचा खलनायक ठरू शकतो. यासोबतच अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांना चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे.