AB Form एकच फॉर्म नसतो तर दोन फॉर्म असतात; उमेदवाराला कोण देतं हा फॉर्म?

AB Form म्हणेज काय? उमेदवाराला कोण देतं हा फॉर्म? जाणून घेऊया. 

Oct 29, 2024, 23:28 PM IST

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडाला आहे.  29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख होती. ही मुदत संपली आहे. उमेदवारा अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना AB Form दिला जातो. हा AB Form म्हणजे नेमका काय असतो? उमेदवाराला कोण देतं हा फॉर्म? जाणून घेऊया.

1/7

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून AB Form  ची चांगलीच चर्चा आहे. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे पक्षाने हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवले आहेत.

2/7

फॉर्म बी हा पक्षाच्या पर्यायी उमेदवारासाठी असतो. मात्र, अर्ज दाखल करताना उमेदवाराला A आणि B असे दोन मिळून  AB Form भरावा लागतो. 

3/7

उमेदवारीच्या वेळी पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला ए फॉर्म हा भरावाच  लागतो. या फॉर्मवर पक्षाचा अधिकृत शिक्का व तिकीट वाटपासाठी पक्षाने नेमलेल्या प्रमुख व्यक्तीची स्वाक्षरी असते.   

4/7

 पक्षाकडून एबी फॉर्म मिळालेला उमेदवार हा त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार समजला जातो. पक्षाशी संबंधित अधिकृत चिन्हावर हा उमेदवार निवडणूक लढवतो.  

5/7

AB Form एकच फॉर्म नसतो तर दोन फॉर्म असतात. पहिला फॉर्म म्हणजे, फॉर्म  A आणि दुसरा म्हणजे फॉर्म  B. या दोन्ही फॉर्म्सना एकत्रितपणे AB फॉर्म असं म्हटलं जातं.   

6/7

 केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार लोकसभा किंवा विधानसभेत एखाद्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी AB Form अत्यंत महत्वाचा असतो. पक्षाकडून उमेदवाराला AB Form दिला जातो. 

7/7

 30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तर  4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल.. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडेल तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा महानिकाल लागेल.