Diwali Padwa Wishes in Marathi: पती-पत्नीचं नातं खुलवणारा सण म्हणजे दिवाळी पाडवा; पाठवा एकमेकांना प्रेमळ शुभेच्छा
Diwali Padwa Wishes in Marathi: दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानण्यात आला आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा साजारी केली जाते. नवरा बायकोसाठी हा दिवस अत्यंत खास मानला जातो.
दिवाळीच्या सणामधील चौथा दिवस म्हणजे 'दिवाळी पाडवा'. हा दिवस यंदा 2 नोव्हेंबर रोजी शनिवारी साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. पाडवा हा सण अतिशय महत्त्वाचा असतो. हा दिवस पती-पत्नीच्या नात्यातील अतिशय खास दिवस आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या या दिवशी अभ्यंगस्नानाची रीत आहे. पती-पत्नीच्या नात्याला देखील साजरा करणारा हा सण आहे. पत्नी पतीचं या सणाच्या निमित्ताने औक्षण करते आणि पती तिला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो.