ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, भारताच्या चिनाब ब्रीजवर चीनचा नजर; पाकिस्तानच्या मदतीने रचला जायोत मोठा कट?
Chenab Railway Bridge :काश्मीरच्या अत्यंत दुर्गम भागात अशक्य बांधकामं करण्यात आले आहे. येथे अतिविशाल असा चिनाब रेल्वे पुल उभारण्यात आला. चीन या ब्रीजची हेरगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे.
Pakistani and Chinese intelligence agencies on Chenab Railway Bridge : कुणी म्हणतं हे आश्चर्य आहे... कुणी म्हणतं हे अद्भूत आहे... कुणी म्हणतं अविश्वनीय आहे... कुणासाठी हे स्वप्नवत आहे.. तर कुणासाठी शेकडो किलोमीटरचा वळसा वाचवणारं आहे आणि अमाप संधी उघडणारा राजमार्ग आहे... यातून सगळ्या जगाला भारतीय इंजिनियर्सची अजोड बुद्धिमत्ता दिसलीये. भुगोल आणि विज्ञानाची सगळी सर्व आव्हानं झेलत हा अतिविशाल पूल उभारला जातोय... पॅरीसचा आयफेल टॉवरही त्याच्यापुढे खुजा ठरेल. काश्मीरच्या अत्यंत दुर्गम चिनाब रेल्वे ब्रीज बांधण्यात आला आहे. भारताच्या चिनाब ब्रीजवर चीनची नजर आहे. पाकिस्तानच्या मदतीने मोठा कट रचला जात आहे.