3350 फूट उंचीवर असलेला साताऱ्याचा थरारक सज्जनगड; अंगावर शहारे आणणार मशाल महोत्सव

Diwali 2024: साताऱ्याच्या सज्जनगड किल्ल्यावर मशला महोत्सव पार पडला. या मशाल महोत्सवाचे सुंदर फोटो. 

Nov 01, 2024, 21:26 PM IST

Sajjangad Fort, Satara : महाराष्ट्रातील गड किल्ले हे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साश्रिदार आहेत. यापैकीच एक आहे तो 3350 फूट उंचीवर असलेला साताऱ्याचा थरारक सज्जनगड. दिवाळी निमित्ताने सज्जनगडावर मशाल महोत्सव पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगड ही शिवशाहीची तर सज्जनगड ही अध्यात्मिक राजधानी मानली जात होती. समर्थ रामदास स्वामी यांनी सज्जनगड किल्ल्यावर समाधी घेतली. सातारा शहरापासून अवघ्या 9 कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ल्याला 750 पायऱ्या आहेत. 

1/10

अंधारत शेकडो मशालीच्या प्रकाशाने सज्जनगड उजळून निघाला. अंगावर शहारे आणणार असा हा मशाल महोत्सव आहे. 

2/10

गड संवर्धनाचे आणि गड-किल्ल्यांचा तेजोमय इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी य़ा मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

3/10

परळी पंचक्रोशीतील शिवसमर्थ भक्त दुर्ग संवर्धक गेल्या पाच वर्षापासून सज्जनगडावर मशाल महोत्सव आयोजीत करत आहेत. 

4/10

शेकडो पणत्या फटाक्यांची आतिषबाजी आणि शेकडो मशालीमुळे सज्जनगड प्रकाशमय झाला.

5/10

दुर्गप्रेमी समर्थभक्त भाविकांनी मशालोत्सवास गर्दी केली होती.  

6/10

दुर्गप्रेमी समर्थभक्त भाविकांनी मशालोत्सवास गर्दी केली होती

7/10

शिवाजी महाद्वार ,श्री समर्थ महाद्वार झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच सज्जनगड पायरी मार्ग पणत्यांनी उजळला होता

8/10

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मशाल उत्सवाला प्रारंभ झाला.  

9/10

साता-यातील सज्जनगड किल्ल्यावर दिवाळीच्या पहिल्या पहाटे मशालोत्सव उत्साहात साजरा झाला.

10/10

साता-यातील सज्जनगड किल्ल्यावर दिवाळीच्या पहिल्या पहाटे मशालोत्सव उत्साहात साजरा झाला.