Weekly Horoscope : नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? या लोकांना मिळणार तिप्पट नफासह करिअरमध्येही यश

Weekly Horoscope 25 november to 1 december 2024 in Marathi : नोव्हेंबरच्या शेवटचा आठवड्याची सुरुवात महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापनेने होणार आहे. महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यात या आठवड्यात मंगळवारी उत्पन्ना एकादशीचं व्रत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीत सूर्य, बुध आणि चंद्र यांच्या संयोगाने तयार झालेला त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. या योग राशींवर परिणाम करणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Nov 24, 2024, 13:53 PM IST
1/12

मेष (Aries Zodiac)

नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा या लोकांसाठी लाभ आणि आर्थिक प्रगती घेऊन आला आहे. यांच्यासाठी आर्थिक दृष्टीकोनातून हा आठवडा अनुकूल असणार आहे. या लोकांना मोठा अचानक पैसे मिळणार आहेत. व्यवसायिकांसाठी हा आठवडा नफा देणारा ठरणार आहे. कौटुंबिक निर्णय तुमचे चांगले परिणाम देणारे ठरणार आहेत. त्यासोबत आठवड्याच्या शेवटी चर्चेने प्रकरणे सोडवली तर बरे परिणाम तुम्हाला मिळतील. कामाच्या ठिकाणी अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र कष्टाने समाजात आपले स्थान प्राप्त केलेल्या महिलेमुळे त्रास होण्याची भीती आहे. शुभ दिवस: 25,28  

2/12

वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांना नोव्हेंबरचा शेवटचा आठवड्यात आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात आरोग्य उत्तम राहील. या आठवड्यात, जर तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञानाचे पालन केले आणि तुमच्या कौटुंबिक बाबींवर निर्णय घेतल्यास, तुम्ही आनंदी व्हाल आणि परस्पर प्रेम मजबूत करण्यात यशस्वी होणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासामुळे तुम्हाला भावनिक शांतता लाभणार आहे. प्रवास गोड आठवणींनी भरलेला असणार आहे. आर्थिक बाबतीत खर्च अधिक होणार असल्याने तुम्ही अचडणीत येऊ शकता. या आठवड्यात अहंकाराचा संघर्ष टाळल्यास जीवनात आनंदी असणार आहे. कामाच्या ठिकाणी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे. शुभ दिवस: 27,28,29  

3/12

मिथुन (Gemini Zodiac)

या लोकांसाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुम्ही नवीन प्रकल्पाकडे आकर्षित होणार आहात. या आठवड्यात करिअरशी संबंधित सुधारणा होणार आहे. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल राहणार असून आर्थिक लाभ होणार आहे. जीवनात बहुआयामी दृष्टीकोन ठेवून पुढे गेल्यास आनंदच आनंद असेल. आरोग्य निरोगी असणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचे शुभ परिणाम मिळणार असून समाजात मान सन्मान वाढणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये थोडा आळशीपणामुळे तुम्ही जरा अस्वस्थ असणार आहात. आठवड्याच्या शेवटी पितृत्वाची चिंता वाढणार आहे. या आठवड्यात पैसे वाचविण्यावर भर द्या. शुभ दिवस: 26,28  

4/12

कर्क (Cancer Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात तुम्हाला काही नवीन गुंतवणुकीतून पैसे मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. तुमच्या जीवनातही आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा दिसणार आहे. थोडेसे ध्यान आणि योग तुम्हाला निरोगी ठेवणार आहे. या आठवड्यात प्रवासादरम्यान महिलेच्या मदतीने जीवनात सुख-समृद्धीची नांदणार आहे. प्रवासातून यश मिळणार आहे. कौटुंबिक बाबतीत वेळ चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणार आहे. आठवड्याच्या शेवटी काही बातम्या मिळाल्याने तुमची चिंता वाढणार आहे. शुभ दिवस: 26,28  

5/12

सिंह (Leo Zodiac)

नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती घेऊन आला आहे. तुमच्या मान सन्मानातही लक्षणीय वाढ होणार आहे. हा आठवडा तुमच्या करिअरमध्ये खूप सुधारणा करणार आहे. आर्थिक बाबात या आठवड्यात तुम्हाला चांगला लाभ होणार आहे. कुटुंबात तरुणाच्या उपस्थितीने मन समाधानी राहणार असून चांगली बातमी कानावर पडणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासामुळे तुमचे राहणीमान सुधारणार आहे. आठवड्याच्या शेवटी आनंदाचे दरवाजे उघडत आहेत. जीवनात तुम्ही समाधानी असणार आहात. शुभ दिवस: 25,26,29  

6/12

कन्या (Virgo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आठवडा आर्थिक लाभाचा असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार असून आईरुपी महिलेच्या मदतीने तुमच्या जीवनात सुख-समृद्धीच्या शुभ संधी निर्माण होणार आहे. या आठवड्यात आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असणार असून आर्थिक लाभ चांगला होणार आहे. या आठवड्यापासून आरोग्यात सुधारणा दिसून येईल. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास चांगले परिणाम तुम्हाला मिळेल. या आठवड्यात तुम्ही कौटुंबिक बाबींमध्ये थोडे निराश असणार आहात. असे वाटेल की जीवनातील परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर जाताना तुम्हाला वाटणार आहे. शुभ दिवस: 25  

7/12

तूळ (Libra Zodiac)

या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांसाठी सुख-शांतीची शुभ शक्यता असणार आहे. महिलेच्या मदतीने तुमच्या जीवनात सुख-शांती नांदणार आहे. तुमच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही काही ठोस निर्णय घेणार आहात. या आठवड्यात केलेल्या प्रवासामुळे सुधारणा आणि यश मिळणार आहे. आर्थिक लाभही तुम्हाला या आठवड्यात होणार आहे. या आठवड्यापासून तुमच्यासाठी प्रगतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. पण ती तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असणार आहे. आर्थिक बाबींमध्ये अहंकाराचा संघर्ष टाळणे आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय या आठवड्यात पुढे ढकलणे तुमच्यासाठी चांगले ठरेल. सप्ताहाच्या शेवटी जीवनात बरीच सुधारणा होईल आणि मान-सन्मान वाढणार आहे. शुभ दिवस: 26,27,29  

8/12

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात केलेल्या प्रवासातून प्रचंड यश लाभणार आहे. प्रवासादरम्यान तुम्ही आनंदी असणार आहात. थोडीशी जोखीम पत्करून निर्णय घ्याल तेव्हाच आर्थिक बाबतीत यश मिळणार आहे. व्यावहारिक पद्धतीने निर्णय घेतल्यास चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या तब्येतीत मर्यादा जाणवतील आणि याकडे नक्कीच लक्ष द्या. कौटुंबिक बाबींमुळे रात्रीची झोप खराब होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष तुम्हाला द्यावे लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला तुमच्या जीवनात हवे असलेले बदल साध्य करण्यासाठी अधिक वेळ लागेल. शुभ दिवस: 28  

9/12

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. एखादा जुना प्रकल्प पुन्हा सुरू करणार आहात. कोर्ट केसेसमध्ये विजय मिळणार आहे. आर्थिक बाबतीतही यश मिळणार असून आर्थिक लाभही होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अनेक संधी मिळणार आहे. परस्पर समंजसपणा राहणार आहे. या आठवड्यात प्रवासात चढ-उतार होतील पण शेवटी आनंदी राहाल. कौटुंबिक बाबींमध्ये नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी, तरुण व्यक्तीच्या बाबतीत तुमच्या मनात समस्या वाढणार आहे. शुभ दिवस: 26,28  

10/12

मकर (Capricorn Zodiac)

या आठवड्यात मकर राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी सुधारणा दिसणार असून यश मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही आर्थिक बाबतीत केलेली मेहनत भविष्यात तुमच्यासाठी आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण करणार आहे. या आठवड्यात सकारात्मक निर्णय घेतल्याने तुमचा त्रास वाढणार आहे. कुटुंबातील मोठ्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला जीवनात आनंद आणि शांती मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासातही यश मिळणार आहे. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असणार आहे. आठवड्याच्या शेवटी, आपण जीवनातील बदलांबद्दल थोडे हलके वाटणार आहे.  शुभ दिवस: 27,28  

11/12

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहे. तुम्ही तुमच्या भविष्याची योजना करून प्रगतीच्या मार्गावर पुढे जाणार आहात. आर्थिक बाबतीत काळ अनुकूल राहणार आहे. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीकडे संयमाने लक्ष दिले तर तुम्हाला जीवनात पैसा तर मिळेलच पण आनंदीही तुम्ही राहणार आहात. तुमचा प्रवास यशस्वी करण्यासाठी तुम्हाला मजबूत व्यक्तिमत्व असलेल्या महिलेची मदत मिळणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये सुधारणा होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असणार आहे. तरुण व्यक्तीबद्दलही चिंता वाढणार आहे. सप्ताहाच्या शेवटी ध्यान आणि योगाद्वारे जीवनात सुख-समृद्धी असणार आहे. शुभ दिवस: 25,28,29  

12/12

मीन (Pisces Zodiac)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रवासात यश मिळणार आहे. नवीन ठिकाणी प्रवास करण्याचा निर्णय तुम्ही घेणार आहात. तुम्हाला कुटुंबातही आराम वाटणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ घालवणार आहात. सप्ताहाच्या सुरुवातीला मनात काही शंका राहील पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतशी जीवनात शांतता राहणार आहे. या आठवड्यात भावनिक कारणांमुळे त्रास वाढू वाढणार आहे. आर्थिक बाबतीत थोडी निराशा वाटण्याची शक्यता आहे. याकडे जरूर लक्ष द्या. कामाच्या ठिकाणीही काही बातम्या मिळाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटेल. शुभ दिवस: 28,28,29 (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)