अँटिलिया आधी मुकेश आणि निता अंबानी कुठे राहायचे?

अँटिलियात राहायला येण्याआधी मुकेश अंबानी आणि कुटुंबीय मुंबईत आधी कुठे राहायचे हे तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या.

| Nov 24, 2024, 13:49 PM IST

अँटिलियात राहायला येण्याआधी मुकेश अंबानी आणि कुटुंबीय मुंबईत आधी कुठे राहायचे हे तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या.

1/7

अँटिलिया आधी मुकेश आणि निता अंबानी कुठे राहायचे?

अँटिलिया आधी मुकेश आणि निता अंबानी कुठे राहायचे?

 देश आणि आशियातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी सर्वात महागड्या आणि आलिशान घरात राहतात. पण तुम्हाला माहितीये का अँटीलिया आधी मुकेश अंबानी मुंबईत कुठे राहायचे?

2/7

 मुंबईतील 27 मजली अँटिलिया बकिंगहम पॅलेसनंतर जगातील सर्वात महागड्या घरापैकी एक आहे. अत्याधुनिक सुविधा आणि फॅसिलिटी या घरात आहेत. या घराची किंमत 15000 कोटींहून अधिक असल्याचे बोलले जाते. 

3/7

 अँटिलियाआधी अंबानी कुटुंबीय मुंबईतील सी-विंड अपार्टमेंटमध्ये राहत होते. मुंबईतल्या कुलाबा येथील 14 मजली इमारतीत अंबानी कुटुंब राहत होते. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाबरोबरच अनिल अंबानींचे कुटुंब आणि आई कोकिळाबेनदेखील या इमारतीत राहत होत्या. 

4/7

कुलाब्यातील कफ परेड येथील सी विंड इमारत दक्षिण मुंबईत आहे. धीरुभाई अंबानी त्यांच्या मुलाखतीत अनेकदा या घराचा उल्लेख करायचे. 

5/7

या इमारतीत घरातील प्रत्येक सदस्यासाठी वेगळा मजला होता. सर्व सोयी-सुविधा या इमारतीत होत्या. दीर्घकाळापर्यंत संपूर्ण अंबानी कुटुंब या घरात राहत होते. 2011मध्ये मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबासह अँटिलियामध्ये राहण्यासाठी गेले. 

6/7

कफ रोडच्या सी विंड इमारतीत भलेही सगळ्या सुविधा असतील मात्र  40000 स्केअरफुटवर असलेल्या अँटिलियासमोर हे घर लहान आहे. मुंबईतील अल्टमाउंट रोडवर असलेल्या अँटिलियाला शिकागोचे आर्किटेक्स पार्किंस अँड विलेने डिझाइन केले आहे. 

7/7

मुकेश अंबानी अँटिलियामध्ये शिफ्ट झाल्यानंतर अनिल अंबानी सी विंड हाउसमध्ये राहायचे. मात्र काही वर्षांनी अनिल अंबानीदेखील त्यांच्या कुटुंबासह पाली हिल येथे असलेल्या नवीन घरात Adobe मध्ये राहण्यास गेले आहेत. या घराची किंमत जवळपास 5 हजार कोटी असल्याचे बोलले जात आहे.