Virat Kohli Marksheet: गणितात 51, विज्ञानात 55...; विराटचा 10 वीचा रिझल्ट झाला लीक

सोशल मीडियावर कोहलीने 10वी वर्गाची मार्कशीट शेअर केलीये.

Mar 30, 2023, 21:15 PM IST
1/5

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहलीने त्याच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केलीये. यावेळी त्याने चाहत्यांना एक प्रेरणादायी संदेश दिला आहे.

2/5

सोशल मीडियावर कोहलीने 10वी वर्गाची मार्कशीट शेअर केलीये.

3/5

ही मार्कशीट शेअर करताना कोहलीने लिहिलंय की, मार्कशीटवर कमी दिसणाऱ्या गोष्टी खऱ्या आयुष्यात सर्वात जास्त असतात. 

4/5

2004 साली कोहलीने 10 वीची परिक्षा दिली होती. यामध्ये कोहलीला इंग्रजीमध्ये 83, हिंदीमध्ये 75, सायन्समध्ये 55, सामाजिक शास्त्रात 81 मार्क मिळाले होते. तर सर्वात कमी मार्क गणितात मिळाले असून तो केवळ 51 मार्कच मिळवू शकला होता.

5/5

क्रिकेटमधील करियर बनवण्यामध्ये व्यस्त असल्याने कोहलीला बारावीनंतर पुढील शिक्षण पूर्ण करता आलं नाही.