जेवढा पैसा चित्रपट बनवायला लागला त्याच्या अर्धी रक्कम मानधन म्हणून घेतली; 'या' भारतीय अभिनेत्याने सर्वांचे रेकॉर्ड मोडले

अल्लू अर्जुन याने विजय थलपती याचा रेकॉर्ड मोडला आहे. 

वनिता कांबळे | Nov 15, 2024, 22:26 PM IST

Allu Arjun Highest Paid Actor:  भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता असा रेकॉर्ड अभिनेता विजय थलपती याच्या नावावर आहे. काही महिन्यांपूर्वीच  विजय थलपती याने बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचा रेकॉर्ड मोडला होता. आता मात्र, अल्लू अर्जुन हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. 

1/8

 साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' हा चित्रपट हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार. चित्रपट रिलीज होण्याआधीच  अल्लू अर्जुन याने नवा विक्रम रचला आहे. 

2/8

‘थलपती 69’ या या चित्रपटासाठी  विजय थलपती याने 275 कोटींचे मानधन घेतले. तो सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला होता. त्याचा हा रेकॉर्ड अल्लू अुर्जनने मोडला आहे. 

3/8

आत्तापर्यंत शाहरुख खान हा भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता होता. त्याने एका चित्रपटासाठी 250 कोटी रुपयांचे मानधन घेतले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी विजय थलपती याने त्याचा रेकॉर्ड मोडला होता. 

4/8

निर्मात्यांनी अल्लू अर्जुनच्या फीबद्दल कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. 

5/8

जेवढा पैसा 'पुष्पा 2'   चित्रपट बनवायला लागला त्याच्या अर्धी रक्कम अल्लू अर्जुन याने मानधन म्हणून घेतल्याचे समजते.

6/8

Track Tollywood च्या रिपोर्टनुसार, अभिनेता अल्लू अर्जुनने 'पुष्पा 2' चित्रपटासाठी 300 कोटी रुपये इतके मानधन घेतल्याची चर्चा आहे. 

7/8

'पुष्पा 2' चित्रपटात अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पा राजच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत रश्मिका मंदानाची केमिस्टी पहायला मिळणार आहे. 

8/8

विजय थलपतीला मागे टाकून अभिनेता अल्लू अर्जुन हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.