Modi Surprise Visit To Central Vista: नव्या संसद भवनाचे भव्यदिव्य रुप पाहून डोळे दिपतील! PM मोदी Surprise Visit ला आले अन्...

PM Modi Surprise Visit To Central Vista: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दुपारच्या सुमारास अचानक निर्माणाधीन असलेल्या नवीन संसदेच्या इमारतीला भेट दिली. या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं, पंतप्रधान अचानक या इमारतीची पहाणी करण्यासाठी का पोहोचले हे जाणून घेऊयात या गॅलरीमधून...

Mar 30, 2023, 21:04 PM IST
1/10

Modi Surprise Visit To Central Vista

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अचानक दिल्ली येथे बांधकाम सुरु असलेल्या सेंट्रल विस्ता या नव्या संसदेच्या इमारतीला भेट दिली.

2/10

Modi Surprise Visit To Central Vista

यावेळेस पंतप्रधान मोदींबरोबर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला देखील होते. अन्य अधिकारी आणि या इमारतीचे बांधकाम करणारे कर्मचारीही यावेळेस उपस्थित होते.

3/10

Modi Surprise Visit To Central Vista

पंतप्रधान मोदींनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक या ठिकाणाला भेट दिली आणि येथील सोयी सुविधा आणि कामाची पहाणी केली.

4/10

Modi Surprise Visit To Central Vista

मोदींनी जवळजवळ एक तास या नव्या संसदेमधील लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहाची पहाणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

5/10

Modi Surprise Visit To Central Vista

नवी सभागृहं ही आताच्या सभागृहांपेक्षा मोठी असतील. लोकसभेची आसन क्षमता 770 असेल तर राज्यसभेची 384 इतकी असेल.

6/10

Modi Surprise Visit To Central Vista

मोदींनी यावेळेस या नव्या इमारतीत केलेली कलाकुसरही पाहिली.

7/10

Modi Surprise Visit To Central Vista

यावेळेस मोदींनी ही इमारत उभारण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही भेट घेतली.

8/10

Modi Surprise Visit To Central Vista

सेंट्रल विस्ता हा पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. नवीन संसद हा याच प्रोजेक्टचा भाग आहे.

9/10

Modi Surprise Visit To Central Vista

सध्या नवी दिल्लीमधील 3 किलोमीटरच्या राजपथ, राष्ट्रपती भनवापासून ते इंडिया गेटपर्यंतच्या भागाचं नुतनीकरण करुन या ठिकाणी नवीन कार्यालये उभारण्यात येणार आहेत.

10/10

Modi Surprise Visit To Central Vista

पंतप्रधान निवासाबरोबर उपराष्ट्रपतींचं निवासस्थानही याच प्रकल्पामध्ये नव्याने उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्पाचं काम टाटा प्रोजेक्टस लिमिटेडला देण्यात आलं आहे.