भारतातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 ऑक्टोबरपासून TRAI च्या नियमात मोठा बदल

टेलिकॉम कंपन्यांची मनमानी कमी व्हावी आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी ट्राय अनेकदा अशी पावले उचलते. 

Pravin Dabholkar | Sep 29, 2024, 18:46 PM IST

TRAI New Rule: टेलिकॉम कंपन्यांची मनमानी कमी व्हावी आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी ट्राय अनेकदा अशी पावले उचलते. 

1/9

भारतातील कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी, 1 ऑक्टोबरपासून TRAI च्या नियमात मोठा बदल

TRAI New Rule Change From 1 October 2024 Mobile airtel jio VI Users tech Marathi News

TRAI New Rule: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) कडून  मोबाईल युजर्सच्या सोयीसाठी वेळोवेळी नियमात बदल केला जातो.

2/9

ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा

TRAI New Rule Change From 1 October 2024 Mobile airtel jio VI Users tech Marathi News

टेलिकॉम कंपन्यांची मनमानी कमी व्हावी आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी ट्राय अनेकदा अशी पावले उचलते.

3/9

नवीन नियम लागू

TRAI New Rule Change From 1 October 2024 Mobile airtel jio VI Users tech Marathi News

ट्राय आता 1 ऑक्टोबरपासून संपूर्ण भारतात नवीन नियम लागू करणार आहे. नवीन नियमानंतर Jio, Airtel, Vi आणि BSNL ग्राहकांना काही नवीन सेवा मिळणार आहेत.

4/9

अंमलबजावणीची तारीख एक महिन्याने वाढवली

TRAI New Rule Change From 1 October 2024 Mobile airtel jio VI Users tech Marathi News

ऑनलाइन फसवणूक आणि घोटाळ्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी हे नियम आधी 1 सप्टेंबरपासून लागू केले जाणार होते. पण, टेलिकॉम कंपन्यांना थोडा वेळ मिळावा म्हणून ट्रायने त्याच्या अंमलबजावणीची तारीख एक महिन्याने वाढवली. 

5/9

1 ऑक्टोबरनंतर बदल

TRAI New Rule Change From 1 October 2024 Mobile airtel jio VI Users tech Marathi News

1 ऑक्टोबरनंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कोणत्या नवीन सेवा मिळणार आहेत ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

6/9

नेटवर्कची माहिती मोबाईलमध्ये

TRAI New Rule Change From 1 October 2024 Mobile airtel jio VI Users tech Marathi News

दूरसंचार कंपनीकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेटवर्क दिले जातात. 1 ऑक्टोबरपासून तुमच्या परिसरात कोणते नेटवर्क उपलब्ध आहेत याची माहिती तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल.

7/9

नेटवर्कबद्दल तपशीलवार माहिती देण्याचे निर्देश

TRAI New Rule Change From 1 October 2024 Mobile airtel jio VI Users tech Marathi News

TRAI ने जियो, एअरटेल, वोडाफोन आणि बीएसएनएलसारख्या दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांच्या सोयीसाठी त्यांच्या वेबसाइटवर नेटवर्कबद्दल तपशीलवार माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

8/9

स्पॅम कॉलची वेगळी यादी

TRAI New Rule Change From 1 October 2024 Mobile airtel jio VI Users tech Marathi News

दूरसंचार कंपन्यांनी फसवणूक आणि घोटाळे रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश ट्रायने दिले आहेत. स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना अशा स्पॅम कॉलची वेगळी यादी तयार करण्यास सांगितले आहे.

9/9

डिजिटल प्लॅटफॉर्मवर हस्तांतरित

TRAI New Rule Change From 1 October 2024 Mobile airtel jio VI Users tech Marathi News

1 ऑक्टोबरपासून कम्युनिकेशनसाठी केवळ सुरक्षित URL आधारित किंवा OTP लिंक पाठवल्या जातील. 30 सप्टेंबरपर्यंत 140 सिरीजने सुरू होणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांचे टेलिमार्केटिंग कॉल आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर हस्तांतरित केले जातील.