21 व्या वर्षी मुंबईत घर, 250 कोटींची संपत्ती, या 23 वर्षांच्या नटीने बड्या अभिनेत्रींना टाकलं मागे!

बॉलिवूडमध्ये असे कित्येक कलाकार आहेत ज्यांची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. बॉलिवूड किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचा सुद्धा खूप मोठा चाहतावर्ग आहे. परंतु, अशी एक अभिनेत्री आहे तिने आपल्या 23 वर्षाच्या वयात प्रचंड लोकप्रियता मिळवली. फॅन फॉलोइंगच्या बाबतीत तर या अभिनेत्रीने शाहरुख खानलासुद्धा मागे टाकलं आहे. बॉलिवूडमधील कित्येक सुंदर अभिनेत्रींना सुद्धा सौंदर्याच्या बाबतीत या अभिनेत्रीने मागे टाकलं आहे. 

Jan 23, 2025, 12:23 PM IST

Famous Actress: बॉलिवूडमध्ये असे कित्येक कलाकार आहेत ज्यांची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. बॉलिवूड किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचा सुद्धा खूप मोठा चाहतावर्ग आहे. परंतु, अशी एक अभिनेत्री आहे तिने आपल्या 23 वर्षाच्या वयात प्रचंड लोकप्रियता मिळवली. फॅन फॉलोइंगच्या बाबतीत तर या अभिनेत्रीने शाहरुख खानलासुद्धा मागे टाकलं आहे. बॉलिवूडमधील कित्येक सुंदर अभिनेत्रींना सुद्धा सौंदर्याच्या बाबतीत या अभिनेत्रीने मागे टाकलं आहे. 

 

1/7

कमी वयात मिळवली प्रचंड लोकप्रियता

अभिनय कार्यक्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत जे फॅन फॉलोइंग आणि नेट वर्थच्याबाबतीत एकमेकांना मागे टाकत आले आहेत. फक्त बॉलिवूड किंवा सिनेसृष्टीतच नव्हे तर टी.व्ही मालिकांमध्ये काम करुन अनेक अभिनेत्रींनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशीच एक टी.व्ही अभिनेत्री आहे जिने अवघ्या 23 वर्षाच्या वयात अभिनय कार्यक्षेत्रात अधिक प्रसिद्धी मिळवली. चाहतावर्ग, सुंदरता आणि नेट वर्थच्याबाबतीत या अभिनेत्रीने कित्येक लोकप्रिय अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. 

2/7

टी.व्ही अभिनेत्री

टी.व्ही क्षेत्रातील अधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं. अनेक टी.व्ही शोमध्ये या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाचा ठसा तर उमटवलाच आहे पण यासोबतच अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा तीचा सहभाग राहिला आहे. आपल्या सौंदर्याने तर तिने सोशल मिडीयावर खूप मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.   

3/7

कोण आहे अभिनेत्री

फक्त टी.व्ही शोमधील अभिनेत्री असण्याव्यातिरिक्त सोशल मिडीया इन्फ्लूएंसर म्हणून सुद्धा तिला ओळखले जाते. कमी वयात प्रचंड लोकप्रिय आणि सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग असलेली ही 23 वर्षीय अभिनेत्री आहे जन्नत जुबेर. 

4/7

सोशल मिडीयावरील फॅन फॉलोइंग

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने तर सर्वांनाच वेड लावले आहे. त्यांचा प्रचंड चाहता वर्ग आहे. फक्त भारतातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा त्याला चाहत्यांचं प्रेम मिळतंय. इंस्टाग्रामवर त्याचे 46 मिलिअनहून अधिक फॉलोअर्स आहेत. परंतु, जन्नत जुबेरने फॅन फॉलोइंगच्या बाबतीत शाहरुखला सुद्धा मागे टाकलं आहे. इन्स्टाग्रामवर जन्नतचे 49.7 मिलियन फॉलोअर्स आहेत जे शाहरुखच्या फॅन फॉलोअर्सपेक्षा कितीतरी जास्त आहेत.  

5/7

जन्नत जुबेरचे करिअर

जन्नतचा जन्म 29 ऑगस्ट 2001 ला मुंबई मध्ये झाला. टी.व्ही शो मध्ये बालकलाकार म्हणून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. 2008 मधील 'चांद के पार चलो' हा तिचा पहिला टी.व्ही शो होता. यानंतर 'दिल मिल गए', 'काशी: अब ना रहे तेरा कागज कोरा', 'फुलवा', 'महाराणा प्रताप', 'तू आशिकी', 'फियर फाइल्स' अशा अनेक टी.व्ही शोमध्ये झळकली आहे. तसेच, राणी मुखर्जीच्या 'हिचकी' या चित्रपटात सुद्धा जन्नतने काम केलं आहे.  

6/7

रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा झळकली

टी.व्ही शोसोबतच जन्नतने अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुद्धा काम केलं आहे. 'फियर फॅक्टर खतरों के खिलाडी 12' आणि 'लाफ्टर शेफ' या शोमध्ये ती झळकली. 'खतरों के खिलाडी' या शोमधील जन्नत ही सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक होती. या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी तिने 18 लाख रुपये घेतले. तसेच, 'लाफ्टर शेफ'च्या प्रत्येक एपिसोडसाठी तिने 2 लाख रुपये इतके मानधन घेतले. ती प्रत्येक पोस्टसाठी दीड ते दोन लाख रुपये मानधन घेते.    

7/7

जन्नत जुबेरचे नेट वर्थ

जन्नत जुबेर रहमानी हे जन्नतचे पूर्ण नाव आहे. जन्नतने केवळ 21व्या वर्षी मुंबईमध्ये आपलं स्वत:चं घर विकत घेतलं. जन्नत एक अभिनेत्रीच नाही तर एक बिझनेसवुमन देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जन्नतची एकूण संपत्ती 250 कोटी रुपये इतकी आहे, यामुळेच ती कोणत्या मोठ्या बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही.