कार-बाईक चालवताना 'या' चुका अजिबात करु नका अन्यथा चलान भरण्यातच जाईल पगार

Traffic Rules In India:अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना पकडल्यास पालक/वाहन मालकास दोषी मानले जाईल आणि 25 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. यासोबतच ३ वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद आहे.

Pravin Dabholkar | Oct 07, 2023, 12:25 PM IST

Traffic Rules In India: सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी वाहतूक नियम आणि त्यांचे पालन आवश्यक आहे. भारतात वाहतुकीबाबत अनेक नियम करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. या कारवाईत चलन तसेच तुरुंगवासाची तरतूद आहे. म्हणूनच रस्ते वाहतुकीच्या नियमांची तुम्हाला माहिती असायला हवी आणि तुम्ही त्याचे पालन करायला हवे. अन्यथा तुम्हाला मोठा दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो.

1/9

कार-बाईक चालवताना 'या' चुका अजिबात करु नका, चलान भरण्यातच जाईल पगार

Traffic Rules In India Avoid mistakes while driving a car-bike

Traffic Rules In India: सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी वाहतूक नियम आणि त्यांचे पालन आवश्यक आहे. भारतात वाहतुकीबाबत अनेक नियम करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. 

2/9

वाहतुकीच्या नियमांची माहिती

Traffic Rules In India Avoid mistakes while driving a car-bike

या कारवाईत चलन तसेच तुरुंगवासाची तरतूद आहे. म्हणूनच रस्ते वाहतुकीच्या नियमांची तुम्हाला माहिती असायला हवी आणि तुम्ही त्याचे पालन करायला हवे. अन्यथा तुम्हाला मोठा दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो.

3/9

दारू पिऊन गाडी चालवणे

Traffic Rules In India Avoid mistakes while driving a car-bike

दारूच्या नशेत गाडी चालवू नका. त्यामुळे जीवितासही धोका निर्माण होतो. दारु पिऊन वाहन चालवताना पकडले गेल्यास पहिल्यांदा 10 हजार रुपयांचे चलन आणि/किंवा 6 महिने तुरुंगवास होऊ शकतो. 

4/9

2 वर्षांचा तुरुंगवास

Traffic Rules In India Avoid mistakes while driving a car-bike

याशिवाय, पुन्हा व्यसनांच्या प्रभावाखाली वाहन चालवताना पकडले गेल्यास, 15 हजार रुपयांचे चलन आणि/किंवा 2 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. 

5/9

परवाना

Traffic Rules In India Avoid mistakes while driving a car-bike

ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवणे ही गंभीर बाब आहे. कारण असे करणाऱ्यांना 5 हजार रुपयांचे चलन बजावले जाते. 

6/9

विमा

Traffic Rules In India Avoid mistakes while driving a car-bike

विम्याशिवाय वाहन चालवल्यास, 2 हजार रुपयांचे चलन आणि/किंवा 3 महिने तुरुंगवास आणि समुदाय सेवेची तरतूद आहे. पुन्हा असे केल्यास चार हजार रुपयांचे चलन कापले जाऊ शकते.

7/9

सिग्नल जंपिंग

Traffic Rules In India Avoid mistakes while driving a car-bike

सिग्नल जंपिंगसाठी, 1 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंतचे चलन जारी केले जाऊ शकते. याशिवाय परवानाही जप्त केला जाऊ शकतो. यासाठी 6 महिने ते 1 वर्षाचा तुरुंगवासही होऊ शकतो. 

8/9

हेल्मेट

Traffic Rules In India Avoid mistakes while driving a car-bike

हेल्मेटशिवाय दुचाकी किंवा स्कूटर चालवल्यास 1000 रुपयांच्या चलनाची तरतूद आहे.

9/9

अल्पवयीन ड्रायव्हिंग

Traffic Rules In India Avoid mistakes while driving a car-bike

अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना पकडल्यास पालक/वाहन मालकास दोषी मानले जाईल आणि 25 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. यासोबतच ३ वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद आहे.