'या' लोकप्रिय अभिनेत्री घटस्फोटानंतर एन्जॉय करतायत सिंगल लाईफ

Actress Who are Still Single After Divorce: सध्याचा जमाना हा बदलला आहे. लोकप्रिय अभिनेत्री या आपल्या घटस्फोटाचंही सेलिब्रेशन करताना दिसतात. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा होताना दिसते, या लेखातून आम्ही त्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या घटस्फोटानंतर आपलं सिंगल आयुष्य हे एन्जॉय करताना दिसत आहेत. 

गायत्री हसबनीस | Jun 01, 2023, 13:18 PM IST

Actress Who are Still Single After Divorce: बॉलिवूडमध्ये चर्चा असते ती म्हणजे सेलिब्रेटींच्या लग्नाची आणि त्यांच्या रिलेशनशिप्सची. त्यामुळे त्यांच्या लिंकअपपासून ते त्यांच्या पॅचअपपर्यंत आणि त्यांच्या ब्रेकअपपासून ते त्यांच्या घटस्फोटापर्यंत सगळ्यांच्याच चर्चा रंगलेल्या असतात. परंतु त्यांच्या बेक्रअपनंतर अथवा त्यांच्या डिवोर्सनंतर ते कसं आयुष्य जगतात याबद्दल फार कोणी विचारात नाही परंतु या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या अभिनेत्रींबद्दल ज्या घटस्फोटानंतर आपलं सिंगल लाईफ एन्जॉय करत आहेत. 

1/6

रश्मी देसाई

rashmi desai

टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मी देसाईनं नंदिश संधूशी लग्नगाठ बांधली होती. परंतु आता ते वेगळे झाले असून रश्मी सिंगल आहे. 

2/6

संजीता शेख

sanjeeta sheikh

लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री संजीदा शेख हिनं तिचा पती आमिर अली यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आपलं सिंगल लाईफ एन्जॉय करते आहे. 

3/6

रिद्धी डोंगरा

riddhi dongra

रिद्धी डोंगरा हिनं अभिनेता राकेश बापट ह्याच्यासोबत घटस्फोट घेतला असून आता ती सिंगल आहे. राकेश बापट हा शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीला डेट करतोय. राकेशनं मराठी चित्रपटांमधूनही कामं केली आहेत. 

4/6

सारा खान

sara khan

सारा खान ही अभिनेत्री आजकाल चर्चेत असते. तिनं बिग बॉसमधून अभिनेता अली मर्चेंटशी लग्न केले होते. आता त्यांचा घटस्फोट झाला असून ती सिंगल आयुष्य जगते. 

5/6

जेनिफर विगेंट

Jennifer Winget

करण सिंग ग्रोवरशी घटस्फोट घेतल्यानंतर जेनिफर विगेंट ही सिंगल आहे तर करण सिंग ग्रोवरनं बिपाशा बापूशी लग्न केले आहे. 

6/6

श्वेता तिवारी

Shweta Tiwari

राजा चौधरीशी घटस्फोट घेतल्यानंतर श्वेता तिवारी आपल्या मुलीसह पलक तिवारीसह सिंगल लाईफ एन्जॉय करते आहे.