मकरसंक्रांतीला भारतातील विविध राज्यात बनवले जातात 'हे' पारंपारिक खाद्यपदार्थ

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने भारतातील राज्यात वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात. पाहूयात, मकरसंक्रांतीला बनवले जाणारे असेच काही खास खाद्यपदार्थ.

Jan 13, 2025, 12:30 PM IST
1/13

गजक

गजक हा पदार्थ भारतभर प्रसिद्ध आहे. मात्र, मध्यप्रदेश मध्ये मकरसंक्रांतीचे औचीत्य साधून हा खाद्यपदार्थ खाल्ला जातो. या प्रथेची सुरुवात मध्यप्रदेशातील मोरेना जिल्ह्यातून झाली असल्याचं मानलं जातं. तूपात तीळ भाजून त्यात साखर किंवा गुळ, पाणी आणि ड्राय फ्रुट्स घालुन गजक हा पदार्थ बनवला जातो.   

2/13

दही-चुरा

बिहार आणि झारखंड या राज्यात मंकरसंक्रांतीच्या दिवशी दही-चुरा खाण्याची परंपरा आहे. पोह्यात दही, गुळ आणि ड्रायफ्रुट्स घालून दही-चुरा बनवला जातो. यात आवडीच्या फळांचा सुद्धा वापर करु शकतो.  

3/13

खिचडी

यूपीसह अनेक राज्यात मकरसंक्रांतीला तांदूळ आणि उडदाच्या डाळीची खिचडी बनवली जाते. म्हणूनच या सणाला खिचडी पर्व सुद्धा म्हटले जाते.   

4/13

अप्पालु

आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील बऱ्याचशा भागात अप्पालू चविष्ट पदार्थ बनवला जातो. हा एक दक्षिणात्या खाद्यपदार्थ असून गव्हाचं आणि तांदळाचं पीठ गुळासोबत मिसळून तेलात परतून घेऊन अप्पालू बनवले जातात.   

5/13

उंधियू

उंधियू हा गुजरात मध्ये मकरसंक्रांतीला बनवला जाणारा एक खास पदार्थ आहे. वालाच्या शेंगा, चवळी, वांगी, कच्ची केळी यासारख्या हंगामी भाज्यांचा वापर करुन उंधियू बनवले जाते. या भाजीला पुरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ले जाते.   

6/13

घुघुतिया

उत्तराखंडातील घुघुतिया हा संक्रातीच्या दिवशी बनवला जाणारा एक प्रचलित खाद्यपदार्थ आहे. पीठ आणि गुळाचे मिश्रण करुन वेगवेगळ्या आकारात घुघुतिया बनवले जातात.     

7/13

पूरण पोळी

मकरसंक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रात पूरण पोळी बनवली जाते. चण्याची डाळ आणि गुळापासून पूरण तयार करुन ते कणकेच्या गोळ्यात भरुन त्याची पोळी केली जाते. पूरण पोळी तूपासोबत खाल्ली जाते.   

8/13

मकर चोला

मकर चोला ही ओडीशा मध्ये बनवला जाणारा एक खास खाद्यपदार्थ आहे. भातासोबत खवलेल्या नारळाचे आणि दूधाचे मिश्रण तयार करुन त्यात साखर, आलं, वेलची पूड, ऊसाचे तुकडे घालून मकर चोला हा पदार्थ बनवला जातो. यात ड्राय फ्रुट्सचा सुद्धा समावेश केला जातो.  

9/13

फेनी

राजस्थान मधील फेनी हा खाद्यपदार्थ खूपच चवीने खाल्ला जातो. भाताला मिक्सर मध्ये वाटून घेऊन नंतर दूधामध्ये खीरीप्रमाणे शिजवले जाते. यानंतर त्यावर ड्राय फ्रुट्स सुद्धा घातले जातात.  

10/13

मुरुक्कु

तमिळनाडू मध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी पोंगल हा सण साजरा केला जातो. यादिवशी मुरुक्कु खाण्याची प्रथा आहे. उडदाची डाळ, पीठ, ओवा आणि तीळ एकत्र करुन त्याची कणीक मळली जाते आणि चकलीच्या आकारात तेलात तळून मुरुक्कु बनवले जातात.  

11/13

पीठे आणि पायेश पुली

हा बंगाली खाद्यपदार्थ असून मकरसंक्रांतीच्या दिवशी बनवला जातो. तांदळाच्या पीठात खवलेला  नारळ घालून त्याचे गुलगुले बनवले जातात, ज्याला पीठे म्हणतात. तसेच, दूध, गुळ आणि भात मिसळून पायेश बनवले जाते.   

12/13

खन्डोह

आसाम मध्ये मकरसंक्रांतीला खन्डोह हा पदार्थ बनवला जातो. भात फ्राय करुन त्यात दूध, दही, गुळ असे पदार्थ मिसळुन चविष्ट खन्डोह बनवले जाते.   

13/13

ऊसाच्या रसाची खीर

मकरसंक्रांतीच्या शूभ दिवशी पंजाबमध्ये ऊसाच्या रसाची खीर बनवली जाते. लोक भाजलेले ड्राय फ्रुट्स घालून या खीरीचा आस्वाद घेतात.