मकर संक्रांतीचा लूक अद्याप ठरला नाही? हे 7 पर्याय करतील मदत

मकर संक्रांतीचा लूक अद्याप ठरला नाही? हे 7 पर्याय करतील मदत 

| Jan 13, 2025, 14:30 PM IST

14 जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. या दिवशी काळ्या रंगाच्या साड्या नेसल्या जातात. अशावेळी काळ्या रंगाच्या कपड्यांचा लूक कसा करायचा, हा प्रश्न पडला असेल तर खालील पर्याय नक्की मदत करतील. 

1/8

14 जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. या दिवशी काळ्या रंगाच्या साड्या नेसल्या जातात. अशावेळी काळ्या रंगाच्या कपड्यांचा लूक कसा करायचा, हा प्रश्न पडला असेल तर खालील पर्याय नक्की मदत करतील. 

2/8

काळ्या रंगाचा ड्रेस आणि ज्वेलरी

काळ्या रंगाचा ड्रेस यावेळी श्रेयाने घातला आहे. यावेळी काळ्या रंगाच्या ड्रेसवर लाल रंगाची ओढणी घेतली आहे. तसेच सोबत तिने काळ्या रंगाचे मोत्याचे दागिने घातले आहेत. 

3/8

पूजा सावंतने याफोटोंमध्ये दोन लूक कॅरी केलेत. गोल्डन सिव्हलेस ब्लाऊज वर काळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर दुसऱ्या लूकमध्ये पैठणीचा काळ्या रंगाचा कफ्टान लूक कॅरी केला आहे. 

4/8

फुल स्लिव्ह हँड ब्लाऊज

काळ्या रंगाच्या साड्या नेसताना त्याचा ब्लाऊजही तितका आकर्षक असणे गरजेच असतं. अशावेळी फुल स्लिव्ह हँड ब्लाऊज सोनालीने या सिल्क साडीवर घातला आहे. 

5/8

प्राजक्ता माळीचा मॉडर्न लूक

प्राजक्ता माळीचा लूक अतिशय मॉडर्न आहे. हातात बाजूबंद, कपाळावर बिंदी आणि गळ्यात नेकलेस घातला आहे. तसेच पायात जाड घुंगराचे पैजण देखील आहे. 

6/8

पारंपरिक आणि मॉर्डन लूक

श्रेया बुगडेने या दोन्ही लूकमध्ये पारंपरिक आणि मॉडर्न लूकचा उत्तम नमुना दाखवला आहे. काळ्या रंगाचा ब्लाऊज आणि त्यावर गोल्डन रंगाचा प्लेन साडी नेसली आहे. हा लूक एनहान्स व्हावा म्हणून फुलांचा वर्क केलेला पट्टा लावला आहे. तसेच नाकात ट्रेंडी नथ आणि मोठे कानातले घातले आहेत.  श्रेयाने दुसऱ्या लूकमध्ये काळी गोल्डन हेवी बॉर्डर प्लेटेड साडी नेसली आहे. यावर तिने लाल रंगाचा ब्लाऊज कॅरी केला आहे. या साडीचा लूक एनहान्स करण्यासाठी गोल्डन चोकर गळ्यात घातलं आहे. 

7/8

काळ्यासाडीसोबत गोल्डन लूक

अक्षरा देवधरने पहिल्या फोटोत काळ्या रंगाच्या साडीला गोल्डन बॉर्डर आहे. यामध्ये तिने गळ्यात मंगळसूत्र आणि मोत्यांचा गोल्डन नेक्लेस आहे. हा लूक देखील तुम्ही करु शकता. तर दुसऱ्या लूकमध्ये अक्षराने काळ्या रंगाच्या साडीला ग्रीन बॉर्डर अशी साडी कॅरी केली आहे. यावर तिने हलव्याचे दागिने घातले आहेत. तुम्ही देखील पहिल्या संक्रांतीला हा लूक करु शकता.  यामध्ये पुरुषांनी कसा लूक करावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हार्दिक जोशीने कॅरी केलेले दोन्ही लूक. काळ्या रंगाच्या कुर्त्यावर गोल्डन पट्टी आहे. तर दुसरा लूक हा काळ्या रंगाचा गिल्टरवाला कुर्ता आहे. 

8/8

काळ्यासाडीसोबत सिल्व्हर लूक

अभिनेत्री ऋजुता बागवेने काळ्यारंगासोबत सिल्व्हर रंगाचं कॉम्बिनेशन केलं आहे. एका लूकमध्ये काळ्या रंगाची साडी ज्यावर रातराणीची फुलं आहे. तर यासोबत तिने सिल्व्हर रंगाच्या बांगड्या आणि गळ्यात घातलं आहे.  तर दुसऱ्या साडीत ऋजुताने काळ्या रंगाची साडी ज्यावर टेम्पल बॉर्डर असलेली साडी नेसली आहे. यावर तिने हेवी झुमके घातले आहेत. ज्यामुळे तिने गळ्यात काही घातलं नाही. तसेच हातात सिल्व्हर बांगड्या घातल्या आहेत.