Photo: 100 वर्षे जुना ट्रेनचा डबा 2.5 लाख रुपयांना केला खरेदी, त्यापासूनच आता वर्षाला होतेय 1 कोटी रुपयांची कमाई

| Jan 13, 2025, 15:07 PM IST

एका अमेरिकन व्यक्तीलाही एक अनोखी कल्पना सुचली. त्याने 100 वर्षे जुना ट्रेनचा डबा विकत घेतला आणि त्याचे रूपांतर एका सुंदर गोष्टींमध्ये करून पैसे कमावले. 

1/7

एका अमेरिकन व्यक्तीलाही एक अनोखी कल्पना सुचली. त्याने आपले घर नव्हे तर रेल्वेच्या जुन्या डब्याचे हॉटेलमध्ये रूपांतर केले. त्याने 100 वर्षे जुना ट्रेनचा डबा विकत घेतला आणि त्याचे रूपांतर एका सुंदर हॉटेलमध्ये केले.

2/7

अमेरिकेतील इडाहो येथे राहणारा 27 वर्षीय इसाक फ्रेंच याने एक अनोखे आणि प्रेरणादायी काम केले आहे. त्याने 100 वर्षे जुना ट्रेनचा डबा विकत घेतला आणि त्याचे रूपांतर एका आलिशान हॉटेलमध्ये केले. इसाकने हा ट्रेनचा डब्बा अडीच लाख रुपयांना विकत घेतला होता, जो पूर्वी एका शेतकऱ्याकडे भंगार म्हणून पडून होता.

3/7

या डब्याची अवस्था अत्यंत वाईट होती. डब्यावर घाण होती, त्याचे लाकूड कुजलेले होते आणि त्यात सुमारे 20 मांजरी राहत होत्या. आयझॅक आणि त्याच्या कुटुंबाने या डब्याचे रुपडं पालटण्यासाठी सुमारे 1.2 कोटी रुपये खर्च केले. यामध्ये डेक बांधणे, मजले दुरुस्त करणे, इलेक्ट्रिकल काम आणि नवीन फर्निचर खरेदी करणे अशा गोष्टी होत्या.  

4/7

रेनेवेशननंतर या ट्रेनच्या डब्याचे आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले. यात एक पॅसेंजर रम, एक लिव्हिंग रूम, कार्गो एरियामध्ये एक कोट आणि सामानाचा रॅक आणि स्लाइडिंग दरवाजासह बाथरूम आहे. याशिवाय त्यामध्ये बेडरूमही बनवण्यात आल्या आहेत.

5/7

इसाकने या हॉटेलची एअरबीएनबीवर नोंदणी केली असून आता लोकांना एका रात्रीसाठी 27 हजार ते 29 हजार रुपये मोजावे लागतात. त्याने यामधून 1 वर्षात 97 लाख रुपयांपर्यंत कमाई केली आहे.  

6/7

या अनोख्या हॉटेलचे डिझाइन इंटीरियर हे राजेशाही शैली आणि आधुनिक सुविधांचा एक अद्भुत संगम आहे, जे पाहुण्यांना पूर्णपणे वेगळा अनुभव देते. लाकडी मजले, आलिशान फर्निचर आणि सुंदर प्रकाशयोजना यामुळे संपूर्ण वातावरण शाही बनते.

7/7

अशाप्रकारे त्या व्यक्तीने एका निरुपयोगी वस्तूला रूपांतरित करून एक उपयोगी वस्तू बनवली. एवढचं नाही तर त्यातून पैसेही कमवले.