PHOTO: 'हे' पदार्थ पुन्हा गरम करुन खाणे घातक, शरीरात जाताच बनतं विष

Food Re-Heating Side Effects: बऱ्याचदा आपण उरलेलं अन्न फेकुन देण्यापेक्षा दूसऱ्या दिवशी गरम करुन खातो. पण तुम्हाला माहितीये, काही पदार्थ पुन्हा गरम केल्यावर त्यात विष बनू लागत. तुमची ही सवय शरीरावर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. पाहुयात कोणते पदार्थ पुन्हा गरम करु नये. 

| Dec 05, 2024, 16:41 PM IST
1/7

1. भात

पुन्हा गरम केलेला भात हा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. जर भाताला तुम्ही नीट ठेवले नाहीत तर यामध्ये बैसिलस सेरेयस जीवाणू तयार होऊ लागतात. जे विषबाधेचं कारण बनू शकतं. 

2/7

2. बटाटा

बटाट्याचे पदार्थ अधिक काळ बाहेर ठेवल्याने त्यामध्ये जीवाणू वाढू लागतात आणि पुन्हा गरम केल्यावर याचं जिवाणूंचा विषासारखा परिणाम होऊ शकतो. 

3/7

3.पालक

पालक पुन्हा गरम करणे धोकादायक आहे. कारण यात असलेले नायट्रेट्स गरम केल्यावर नायट्रोसमाईनमध्ये बदलतात. ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. 

4/7

4.अंडी

उकडलेली अंडी पुन्हा गरम केल्याने ते विषारी बनू शकतात. त्यात असलेले प्रथिने गरम केल्यावर शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. 

5/7

5.चिकन

चिकनमध्ये जास्त प्रथिने असतात. परंतु पुन्हा गरम केल्यावर प्रथिनांची रचना बदलते ज्यामुळे पचनाशी निगडित समस्या किंवा विषबाधा होऊ शकते.   

6/7

6.मशरूम

मशरूम पासून बनवले गेलेले पदार्थ पुन्हा गरम केल्यावर त्यातील प्रथिने नष्ट होतात आणि पोटदुखी किंवा अपचनाच्या समस्या उद्भवतात.   

7/7

7.सेलरी आणि गाजर

भाजी किंवा कोशिंबीरसाठी वापरले जाणारे गाजर आणि सेलरीमध्ये ही नायट्रेट्स असतात. जे पुन्हा गरम झाल्यावर धोकादायक बनू शकतात. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)