कमी वयात मिळालेलं यश कसं हाताळावं? विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉकडून काय शिकावं?
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉबाबत चर्चा होतेय. एकेकाळी कमी वयात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या या दोघांची सद्यस्थिती हा चर्चेचा विषय आहे.
रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विनोद कांबळी याचीच चर्चेत होती. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य पण आज दोघांची अवस्था मात्र वेगवेगळ्या स्तरावर आहे. तसेच दुसऱ्या बाजूला आयपीएल मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ देखील चर्चेत आला. यानंतर कमी वयात मिळालेलं यश याला कारणीभूत असल्याची चर्चा रंगली. अशावेळी कमी वयात मिळालेलं यश कसं हाताळावं हा प्रश्न उपस्थित राहतो.