बायकोला गिफ्ट करुन वाचवता येतो टॅक्स? मोठी कमाई करणारे वापरतात 'या' 5 ट्रिक्स, तुमच्या खूप कामाच्या!

पत्नीला कर्ज देऊन कर वाचवण्याचा काय आहे  प्रकार? अशाने खरचं टॅक्स वाचवता येतो का? टॅक्स वाचवायचा असेल तर सोप्या आणि कायदेशीर ट्रिक्स कोणत्या आहेत? सविस्तर जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Dec 06, 2024, 16:55 PM IST

Tax Saving Tips: पत्नीला कर्ज देऊन कर वाचवण्याचा काय आहे  प्रकार? अशाने खरचं टॅक्स वाचवता येतो का? टॅक्स वाचवायचा असेल तर सोप्या आणि कायदेशीर ट्रिक्स कोणत्या आहेत? सविस्तर जाणून घेऊया.

1/14

बायकोला गिफ्ट करुन वाचवता येतो टॅक्स? मोठी कमाई करणारे वापरतात 'या' 5 ट्रिक्स, तुमच्या खूप कामाच्या!

Tax Saving Tips Transfer Money to Wife Account Personal Finance Rules

अनेकजण प्रेमाखातर पत्नीला गिफ्ट देतात. ज्यामुळे पत्नी आनंदीत राहते आणि संसार सुखाचा होतो. पण मोठी कमाई करणारे काहीजण करामध्ये सवलत मिळावी म्हणून पत्नीला गिफ्ट करतात. काय आहे हा प्रकार? अशाने खरचं टॅक्स वाचवता येतो का? टॅक्स वाचवायचा असेल तर सोप्या आणि कायदेशीर ट्रिक्स कोणत्या आहेत? सविस्तर जाणून घेऊया.

2/14

'क्लबिंग प्रोव्हिजन

Tax Saving Tips Transfer Money to Wife Account Personal Finance Rules

पत्नीच्या खात्यात पैसे जमा करून कर वाचवण्याची पद्धत 'क्लबिंग प्रोव्हिजन' अंतर्गत येते. आयकर कायद्याच्या कलम 60 ते 64 नुसार, जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या खात्यात पैसे जमा केले आणि त्यातून कोणतेही उत्पन्न (जसे की व्याज, भाडे, लाभांश) असेल तर ते उत्पन्न तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते. कर आकारला जातो. याला 'क्लबिंग प्रोव्हिजन' म्हणतात.

3/14

कशी काम करते ही पद्धत?

Tax Saving Tips Transfer Money to Wife Account Personal Finance Rules

तुम्ही तुमच्या पत्नीला पैसे गिफ्ट केल्यास त्यावर कोणताही गिफ्ट टॅक्स लागणार नाही. असे असले तरी यातून मिळणारे उत्पन्न क्लबिंग तरतुदी अंतर्गत येऊन तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाऊ शकते.

4/14

गुंतवणुकीद्वारे कर वाचवण्याचे मार्ग

Tax Saving Tips Transfer Money to Wife Account Personal Finance Rules

तुमच्या पत्नीचे उत्पन्न कमी असल्यास किंवा अजिबात नसल्यास तुम्ही तिच्या नावावर मुदत ठेवी, म्युच्युअल फंड किंवा पीपीएफ सारख्या गुंतवणूक करू शकता. त्यामुळे तुमच्या उत्पन्नावर कमी कर लागेल.

5/14

HRA द्वारे वाचवा कर

Tax Saving Tips Transfer Money to Wife Account Personal Finance Rules

जर तुमचे घर तुमच्या पत्नीच्या नावावर असेल, तर तुम्ही तिला भाडे देऊन एचआरएचा लाभ घेऊ शकता. यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न कमी होईल आणि तुम्ही कर सवलतीचा दावा करू शकाल.

6/14

कर्जाद्वारे बचत

Tax Saving Tips Transfer Money to Wife Account Personal Finance Rules

जर तुम्ही तुमच्या पत्नीला भेटवस्तूऐवजी कमी व्याजावर कर्ज दिले तर त्यामुळे उत्पन्नात होणारी वाढ टाळता येईल. हे सर्व व्यवहार दस्तऐवजीकरण केलेले असावेत हे लक्षात ठेवा.

7/14

बचत खात्यात पैसे ट्रान्सफर करा

Tax Saving Tips Transfer Money to Wife Account Personal Finance Rules

तुमच्या पत्नीच्या बचत खात्यात पैसे जमा करून तुम्ही त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर वाचवू शकता. बचत खात्याच्या व्याजावर ₹ 10,000 पर्यंतची आयकर सवलत उपलब्ध आहे.

8/14

काय केले पाहिजे?

Tax Saving Tips Transfer Money to Wife Account Personal Finance Rules

तुमच्या पत्नीच्या नावावर गुंतवणूक करा. जेणेकरून मिळालेल्या उत्पन्नावर कर कमी लागेल. क्लबिंग तरतूदीचा योग्यरित्या वापर करा. एचआरएद्वारे कर वाचवण्याचा प्रयत्न करा.

9/14

काय करु नये?

Tax Saving Tips Transfer Money to Wife Account Personal Finance Rules

कर वाचवण्याच्या नादात चुकीची माहिती देऊ नका. क्लबिंगच्या नियम, अटींकडे दुर्लक्ष करू नका. कोणताही आर्थिक निर्णय समजून न घेता घेऊ नका.

10/14

लग्नाआधी गिफ्ट

Tax Saving Tips Transfer Money to Wife Account Personal Finance Rules

पहिला मार्ग म्हणजे जे लग्न करणार आहेत त्यांनी लग्नापूर्वी आपल्या भावी पत्नीच्या नावावर कोणतीही मालमत्ता किंवा भेटवस्तू केली तर ते उत्पन्नाच्या एकत्रीकरणाच्या तरतुदीत येणार नाही.

11/14

खर्चासाठी पैसे

Tax Saving Tips Transfer Money to Wife Account Personal Finance Rules

दुसरी पद्धत म्हणजे, जर तुम्ही तुमच्या पत्नीला खर्चासाठी पैसे दिले आणि तिने त्यातून बचत केली तर तेही तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाणार नाही.

12/14

हेल्थ इन्शुरन्स काढा

Tax Saving Tips Transfer Money to Wife Account Personal Finance Rules

तिसरा मार्ग म्हणजे तुम्ही आरोग्य विम्याद्वारेही कर वाचवू शकता. कलम 80D अंतर्गत तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या नावावर आरोग्य विमा प्रीमियमवर 25,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

13/14

कर्ज म्हणून पैसे द्या

Tax Saving Tips Transfer Money to Wife Account Personal Finance Rules

चौथा मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या पत्नीला भेटवस्तूऐवजी कर्ज म्हणून पैसे देऊनही कर वाचवू शकता. तुम्ही तिला कमी व्याजावर कर्ज देऊ शकता. फक्त कर्ज देण्यापासून व्याज घेण्यापर्यंत सर्व कागदपत्रे सोबत ठेवा. यामुळे तुमच्या दोघांचे उत्पन्न क्लब होणार नाही आणि तुमचे कर दायित्व कमी होईल.

14/14

संयुक्त खाते उघडा

Tax Saving Tips Transfer Money to Wife Account Personal Finance Rules

पाचवी पद्धत म्हणजे तुम्ही गुंतवणुकीसाठी संयुक्त खातेदेखील उघडू शकता. फक्त प्रायमरी होल्डर असा असावा, ज्याचे कर दायित्व कमी आहे. कारण जॉइंट अकाऊंटमध्ये व्याजावरील टॅक्स लॅबिलिटी प्रायमरी होल्डरकडे असतात.