एकाच दिवशी भारताच्या 5 स्टार क्रिकेटर्सचा Birthday; बुमराह, जडेजा, श्रेयस आणि ....

Indian Cricketers Birthday : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 डिसेंबरची तारीख अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण यादिवशी एक दोन नाही तर तब्बल 11 खेळाडूंचा वाढदिवस असतो. यात 5 खेळाडू हे भारताचे स्टार क्रिकेटर्स तर 6 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तेव्हा भारतातील कोणत्या 5 दिग्गज क्रिकेटर्सचा वाढदिवस हा 6 डिसेंबर रोजी असतो आणि त्यांच्या कारकिर्दी विषयी जाणून घेऊयात. 

Pooja Pawar | Dec 06, 2024, 14:56 PM IST
1/7

जसप्रीत बुमराह :

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा जन्म 6 डिसेंबर 1993 रोजी अहमदाबाद येथे झाला होता. बुमराह 30 वर्षांचा झाला असून तो भारतीय संघाकडून तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये खेळतो. बुमराहने 30 टेस्ट 128 सामन्यात , 89 वनडे सामन्यात 149 तर 62 टी 20 सामन्यात त्याने 74 विकेट्स घेतल्या आहेत. बुमराह हा सध्याच्या घडीला टेस्ट क्रिकेटमधील नंबर 1 चा गोलंदाज आहे. 

2/7

श्रेयस अय्यर :

29 वर्षांच्या श्रेयस अय्यरचा जन्म हा मुंबईत 6 डिसेंबर 1994 रोजी झाला होता. भारतासाठी अय्यरने 119 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून यात त्याने 4101 धावा केल्या आहेत. अय्यरने भारताकडून 10 टेस्टमध्ये 666 धावा, 58 वनडेमध्ये 2331 तर श्रेयस अय्यरने 51 टी 20 मध्ये 1104 धावा केल्या आहेत.   

3/7

रवींद्र जडेजा :

 रवींद्र जडेजा हा आता 35  वर्षांचा झाला असून त्याचा जन्म सौराष्ट्रमध्ये 6 डिसेंबर 1988 रोजी झाला होता. जडेजाने भारताकडून एकूण 328 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून यात त्याने 546 विकेट्स आणि 6 हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये जडेजाने 5 शतक आणि 19 अर्धशतक तर वनडेत 13 अर्धशतक ठोकली आहेत. 

4/7

आरपी सिंह :

 2007 मध्ये भारताच्या टी 20 चॅम्पियन संघाचा भाग असलेल्या आरपी सिंहचा जन्म हा 6 डिसेंबर 1985 रोजी झाला होता. आरपी सिंह सध्या कॉमेंट्री करताना दिसतो. त्याने भारतासाठी 14 टेस्ट, 58 वनडे आणि 10 टी 20 सामने खेळले आहेत. यात त्याने 124 विकेट्स घेतले आहेत.   

5/7

करूण नायर :

करुण नायर याचा जन्म हा 6 डिसेंबर 1991 रोजी राजस्थानमध्ये झाला असून त्याने भारतासाठी एकूण 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात 6 टेस्ट आणि 2 वनडे सामन्यांचा समावेश आहे. 6 टेस्टमध्ये त्याने 374 धावा केल्या असून 3 वनडेत 46 धावा केल्या आहेत.   

6/7

6 डिसेंबर रोजी वाढदिवस असणाऱ्या 11 खेळाडूंमध्ये 5 भारतीय, 2 झिम्बाब्वे तर 1 न्यूझीलंड, 1 आयर्लंड आणि 1 पाकिस्तानचा समावेश आहे. 

7/7

11 खेळाडूंमध्ये भारताचे जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, करुण नायर, आरपी सिंह, श्रेयस अय्यर, ग्लेन फिलिप्स, हॅरी टॅक्टर, नासिर जमशेद, एंड्रयू फ्लिंटॉफ यांचा समावेश आहे.