नागा चैतन्य अन् सोभिताच्या साखरपुड्यासाठी तारीख खास, काय आहे रणबीर अन् आलियाचं कनेक्शन?

Sobhita Dhulipala and Naga Chaitanya Engagement : साऊथ इंडियन सुपरस्टार अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलीपाला यांचा साखरपुडा 8 ऑगस्टला पार पडला. नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी याची माहिती दिली.

Saurabh Talekar | Aug 08, 2024, 21:23 PM IST
1/5

नागा चैतन्य आणि सोभिता धुलीपाला

अभिनेते नागार्जुन यांनी दोघांचे एकत्र फोटो शेअर केले अन् सर्वांना गुड न्यूज दिली. नागा चैतन्य आणि सोभिता धुलीपाला यांचा साखरपुडा सकाळी ९ वाजून ४२ मिनिटांनी आमच्या घरी पार पडला, असं नागार्जुनने सांगितलं.

2/5

अनंत प्रेमाची सुरुवात

8.8.8 म्हणजेच अनंत प्रेमाची सुरुवात... असं देखील नागार्जुनने कॅप्शनमध्ये लिहिलंय. त्यामुळे 8.8.8 म्हणजे काय? असा प्रश्न सर्वांना पडलाय.

3/5

8.8.8

8.8.8 म्हणजेच, आजची तारीख ८, ऑगस्ट हा आठवा महिना आणि 2024 या वर्षाची बेरीज केल्यास 8 येते. त्यामुळे आजचा गुण जुळून आलाय.

4/5

लायन गेट पोर्टल

खगोलिय शास्त्रानुसार.. पृथ्वी, सिरियस तारा आणि ओरियन नक्षत्र एका रांगेत येतात. तसेच या घटनेला लायन गेट पोर्टल म्हणतात. ‘लायन गेट पोर्टल’ हे सिंह राशीशी संबंधित आहे. 

5/5

रणबीर आलिया

याआधी रणबीर आणि आलिया देखील 8 नंबरमुळे चांगलेच चर्चेत आले होते. दोघंही 8 नंबरची गाडी वापरतात. रणबीरने साखरपुड्यात 8 नंबर म्हणजेच इन्फिनिटीवाली अंगठी वापरली होती.