Shani Margi 2023 : पुढील 235 दिवस 'या' 5 राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी, शनिदेव देणार एकामागोमाग त्रास

Shani Margi 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाचा ग्रह शनिदेव स्वगृहात प्रतिगामी स्थितीतून थेट वळला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला 04 नोव्हेंबरला तो मार्गी झाला असून तो जून 2024 याच स्थितीत असणार आहे. 

Nov 07, 2023, 11:10 AM IST
1/7

शनिदेव मार्गी झाल्यामुळे 12 राशींवरही त्याचा परिणाम होणार आहे. पण काही राशींच्या लोकांवर संकट कोसळणार आहे. 

2/7

पुढील 235 दिवस 'या' 5 राशीच्या लोकांना शनिदेव खूप त्रासदायक ठरणार आहे. जाणून घेऊयात शनीच्या मार्गामुळे कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहावं लागणार.  

3/7

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांना शनीच्या थेट हालचालीमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कर्क राशीत धैया चालू आहे ज्यामुळे या लोकांना आर्थिक चणचण जाणवणार आहे. नात्यात कटुता वाढू शकते आणि आरोग्यावर परिणाम होईल. 

4/7

सिंह (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांना शत्रूंचा त्रास अतिशय होणार आहे. वैवाहिक जीवनात मतभेद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आर्थिक बाबतीत चढ-उतारांचा सामना करावा लागणार आहे. काम, आरोग्यावर परिणाम होणार असून तुम्ही तणावात असणार आहात. 

5/7

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीवर शनीचा प्रभाव असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनि थेट राहिल्याने तणाव आणि कौटुंबिक त्रास देणार आहे. नोकरी आणि व्यवसायात आव्हानांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. 

6/7

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीत शनीची साडेसाती चालू असून या राशीत शनी थेट भ्रमण करत आहे. कुंभ राशीचा स्वामी शनि असल्याने या लोकांना तो फारसा त्रास देत नाही. मात्र या लोकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 

7/7

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांची शनीची साडेसाती सुरु आहे. शनी मार्गी या लोकांच्या नात्यात कलह वाढविण्याची शक्यता आहे. जीवनात तुम्हाला निराश वाटू लागणार आहे. आरोग्याशी संबंधित समस्या त्रासदायक ठरणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)