PHOTO: बॉलिवूडची दमदार ,ग्लॅमरस अभिनेत्री; शाहरुखशी घेतला होता पंगा, वयाच्या 38 व्या वर्षी 400000000 रुपयांची मालकीण

Entertainment : वयाच्या 5 वर्षी कामाला सुरुवात करुन टॅलेंटच्या जोरावर तिने 500 रुपये कमावले. बॉलिवूडची दमदार ,ग्लॅमरस अभिनेत्रीसोबत ती एक व्हॉईस ओव्हर आर्टिस्टदेखील आहे. 

Oct 09, 2024, 10:31 AM IST
1/7

आम्ही बोलत आहोत लोकप्रिय वेब सीरिज 'फोर मोअर शॉट्स प्लीज' फेम अभिनेत्री सयानी गुप्ता तिचा आज वाढदिवस आहे. सयानी गुप्ता यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1985 रोजी पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये झाला. 

2/7

तिने वेब-सिरीज फोर मोअर शॉट्स प्लीज, आर्टिकल 15 आणि मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ सारख्या चित्रपटांमध्ये आपली क्षमता सिद्ध केलीय. ती फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची माजी विद्यार्थिनी आहे. कल्की कोचलिनच्या विरुद्ध 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ' या चित्रपटात एका अंध लेस्बियन मुलीच्या भूमिकेसाठी सयानीने खूप प्रशंसा मिळवली.

3/7

खरं तर सयानी यांनी लहानपणापासूनच ऑडिओचे काम सुरू केलं. त्यांचे बहुतेक बालपण ऑल इंडिया रेडिओच्या स्टुडिओमध्ये गेले कारण तिचे वडील अनाउंसर, म्यूजिक कम्पोजर आणि सिंगर होते. 

4/7

त्याचबरोबर, गायक म्हणून तिने 'आर्टिकल 15' चित्रपटासाठी 'कहब तो' हे गाणे गायले आहे. तसंच 'फोर मोअर शॉट्स प्लीज'च्या साउंडट्रॅकसाठी पार्श्वभूमी आवाजही दिला आहे.

5/7

 सयानी आणि शाहरुख खान यांच्याशी संबंधित एक अतिशय रंजक किस्साही आहे, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. सयानीने एकदा शाहरुख खानला टोमणा मारत म्हटलं होतं की, 'देशातील दलितांच्या दुरवस्थेवर शाहरुखने डोळे, तोंड आणि कान बंद न ठेवता सत्याचे समर्थन केलं पाहिजं.' तिने शाहरुख खानवरची एक पोस्ट रिट्विट करत त्याच्यावर निशाणा साधला होता. 

6/7

सयानीने पुढे लिहिले की, 'योग्य गोष्टींबद्दल बोला. गांधीजींनी सत्यासाठी, उपेक्षित लोकांसाठी, पीडितांसाठी, दलित बंधू-भगिनींसाठी, डोळे, कान, तोंड बंद करू नका, यासाठी आवाज उठवावा. दरम्यान या कमेंटवर शाहरुखकडून कोणतेही वक्तव्य आलेलं नाही. 

7/7

सयानीला अभिनय क्षेत्रात येऊन एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वयाच्या 38 व्या वर्षी अभिनेत्रीने तिच्या मेहनतीच्या जोरावर 5 मिलियन डॉलर्स म्हणजेच 40 कोटी रुपयांची संपत्ती कमावली आहे.