'या' ग्लॅमरस अभिनेत्रीचा नवरा आहे 6504 कोटींच्या संपत्तीचा मालक; तिचं नाव देखील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये

बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेले सेलिब्रिटी हे करोडपती किंवा अब्जोपती आहेत. पण बॉलिवूडमध्ये अनेक श्रीमंत सेलिब्रिटी कपल देखील आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला खूप स्ट्रगल केलं आहे. आज त्यापैकीच एका कपलविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्या दोघांनी त्यांचं आयुष्य हे खासगी ठेवलं आहे. आता हे कपल कोणतं त्याविषयी जाणून घेऊया...

| Jan 18, 2025, 16:44 PM IST
1/7

बॉलिवूडमधील या कपलविषयी बोलायचं झालं तर बायको ही अभिनेत्री आहे तर नवरा हा निर्माता आणि दिग्दर्शक आहे. दोघांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात कमालिचं काम केलं आहे. दोघांना एक मुलगी आहे. हे जोडपं पार्टी, अवॉर्ड शो आणि इतर कार्यक्रमांमध्ये खूप कमी दिसतात. इतकंच नाही तर त्या दोघांनी आजवर त्यांच्या मुलीचा चेहरा देखील कोणाला दाखवला नाही. 

2/7

अजूनही तुम्हाला कळलं नसेल की हे जोडपं कोणतं आहे तर दुसरं कोणी नसून राणी मुखर्जी आणि तिचा नवरा आदित्य चोप्रा आहे. आदित्य चोप्रा हे दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. आदित्य आणि राणी हे दोघं 2014 मध्ये लग्न बंधनात अडकले होते. आदित्य चोप्रा यांचं तर हे दुसरं लग्न आहे. या आधी 2001 मध्ये त्यांचं लग्न पायल खन्नाशी झालं होतं, तर ते दोघं 2009 मध्ये विभक्त झाले. 

3/7

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांचा शाही विवाहसोहळा होता. दोघांनी इटलीमध्ये प्रायव्हेट सेरेमनीमध्ये लग्न केलं होतं. त्यांनी त्यांचं लग्न हे खासगी ठेवलं होतं. त्यांना एक मुलगी असून अदिरा असं तिचं नाव आहे आणि 2015 मध्ये अदिराचा जन्म झाला होता. 

4/7

राणी मुखर्जीनं करिअरची सुरुवात ही 1997 मध्ये राजा की आएगी बारात या चित्रपटापासून केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून हिट झाला होता. त्याशिवाय राणीचं अभिनयाचं कौशल्य सगळ्यांना कळलं होतं. 

5/7

राणीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिचा ब्लॅक चित्रपटातील अभिनय आणि 'मर्दानी' मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे सगळ्यांना माहित आहे. 'मर्दानी' या चित्रपटातील अभिनयासाठी राणीला नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला होता. 

6/7

BollywoodShaadis च्या रिपोर्ट्सनुसार, राणी मुखर्जीची एकूण नेटवर्थ ही 25 मिलियन डॉलर अर्थात 206 कोटींच्या आसपास आहे. ती एका चित्रपटासाठी 7 कोटी मानधन घेत असल्याचं म्हटले जाते. राणीकडे 2 कोटींची Audi A8L W12  तर आदित्य यांच्याकडे देखील लग्झरी गाडी आहे. राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा दोघेही सोशल मीडियावर सक्रिय नाहीत. 

7/7

आदित्य चोप्रा हे यशराज या फिल्म प्रोडक्शन हाऊसचे सीईओ आहेत. आदित्य आणि राणी मुखर्जी हे दोघे मुंबईच्या जुहू अपार्टमेंटमध्ये राहतात. तर BollywoodShaadis च्या रिपोर्ट्सनुसार, आदित्य चोप्राची एकूण नेटवर्थ ही 6504 कोटी आहे.