अभिनेत्रीला निर्मात्याने भोसकलं! मिटींगमध्ये प्रपोज केलं, नकार ऐकताच चेहऱ्यावर..; घटनाक्रम समोर

Famous Actress Stabbed By Producer: हा हल्ला नेमका कसा झाला? नक्की त्यावेळी काय घडलं यासंदर्भातील घटनाक्रम या अभिनेत्रीने सांगितला असून तिने नुकतीच याच प्रकरणासंदर्भात आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्टही केली आहे. तिने नक्की काय म्हटलंय, तिच्याबरोबर काय घडलं पाहूयात...  

Swapnil Ghangale | Oct 09, 2024, 09:45 AM IST
1/17

malvimalhotra

अभिनेत्रीवर झालेल्या या हल्ल्याप्रकरणी आरोपीला कोर्टाने शिक्षाही सुनावली आहे. नेमकं घडलं काय आणि कोर्टाने काय शिक्षा सुनावली जाणून घेऊयात...

2/17

malvimalhotra

ती खरं तर एका निर्मात्याला चित्रपटामध्ये अभिनय करण्यासंदर्भातील कामासाठी भेटली होती. मात्र या भेटीमध्ये अचानक त्या निर्मात्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिने या मागणीला नकार दिला आणि तिथून निघाली.  

3/17

malvimalhotra

मात्र त्यानंतरही हा निर्माता लग्नाचा तगादा लावत तिचा पिच्छा पुरवत होता. तो तिच्यावर पाळत ठेऊ लागला. तिला मेसेज पाठवून त्रास देऊ लागला. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने तिच्यावर प्राणघातक हल्लाही केला.  

4/17

malvimalhotra

या निर्मात्याने अभिनेत्रीवर चाकूने तीन वार केले. यापैकी एक वार तर पोटात केला. चाकू माझ्या पोटात 1.5 इंच आत घुसला होता, असं या अभिनेत्रीचं म्हणणं आहे. मागील चार वर्षांपासून ती या प्रकरणामध्ये न्यायलयीन लढाई लढत होती आणि अखेर तिला न्याय मिळाला आहे.  

5/17

malvimalhotra

"त्याला माझा चेहरा विद्रूप करायचा होता. मात्र मी फार सतर्क होते. म्हणून त्याने हल्ला केल्यानंतर आधी मी माझा चेहरा झाकला. अभिनेत्रीला चेहऱ्यावरील जखमा भरुन काढणं फार कठीण जातं हे मला ठाऊक असल्याने मी चेहरा झाकला," असं या हल्ल्यासंदर्भात बोलताना अभिनेत्रीने सांगितलं.

6/17

malvimalhotra

अभिनेत्रीने चेहरा झाकल्यानंतर हल्लेखोर निर्मात्याने तिने चेहऱ्यावर ठेवलेल्या उजव्या हातावर वार केला. देवाने मला त्या क्षणी सुबुद्धी दिली आणि मी स्वत:चा बचाव करु शकले," असं या अभिनेत्रीने हल्ल्याबद्दल सांगितलं.

7/17

malvimalhotra

तरीही या साऱ्या गोंधळात अभिनेत्रीला गंभीर जखमी करण्याच्या उद्देशाने हल्लेखोराने या अभिनेत्रीच्या पोटात चाकू भोसकला होता. पण ही अभिनेत्री तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरली आणि तिचा जीव वाचला.

8/17

malvimalhotra

ही घटना 2020 साली घडल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणामध्ये मागील आठवड्यात तब्बल चार वर्षानंतर निकाल दिला. हल्लेखोर निर्माता योगेश सिंहला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

9/17

malvimalhotra

अभिनेत्री मालवीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी या योगेश सिंहला दोषी ठरवण्यात आलं आहे. ज्या अभिनेत्रीवर हा हल्ला करण्यात आला होता तिचं नाव आहे मालवी मल्होत्रा. मालवीने या निकालानंतर समाधान व्यक्त केलं आहे. 

10/17

malvimalhotra

"अखेर मला दिलासा देणारा निकाल लागला. मी मागील चार वर्षांपासून यासाठी लढत होते. माझ्यावर फार प्रेशर होतं. मात्र अखेर सत्याचा विजय झाला. यामुळे मला फार मानसिक त्रास झाला. शारीरिक जखमांपेक्षा मानसिक त्रास अधिक झाला," असं मालवीने 'न्यूज 18'ला निकालानंतर दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

11/17

malvimalhotra

"मी हल्ल्यातून सावरत असतानाचा काळ फार कठीण होता. मी फार घाबरायचे. सतत कोणीतरी माझा पाठलाग करतंय असं मला वाटायचं. मात्र माझ्या कुटुंबाने खास करुन माझ्या वडिलांनी मला या साऱ्यातून सावरण्यात फार मदत केली. शारीरिक जखमा भरुन निघतील मात्र मी माझं आयुष्य असं घाबर जगू नये असा सल्ला त्यांनी मला दिला," असं मालवी सांगते.

12/17

malvimalhotra

"त्यांनी मला सेल्फ डिफेन्स शिकण्याचा सल्ला दिला. घराबाहेर पडून शॉपिंगला जा किंवा तुला जे आवडतं ते करं असं बाबांनी मला सांगितलं.अखेर मला हे जाणवलं की हे असं राहून चालणार नाही. आपल्या आयुष्यातील ही अशी दुर्घटना पुन्हा पुन्हा घडणार नाही तर आपण यातून बाहेर आलं पाहिजे," असं मालवी म्हणाली. 

13/17

malvimalhotra

एवढा मानसिक त्रास होत असतानही मालवीने कधी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली नाही. मालवीला तिच्या वडिलांनीच यामधून बाहेर येण्यास मदत केली. 

14/17

malvimalhotra

माझ्या दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर मी यातून बाहेर आहे. माझं मानसिक आरोग्य सुधारण्यात माझ्या वडिलांनी मला फार मदत केली, असं मालवी म्हणते.

15/17

malvimalhotra

चार वर्षानंतर न्याय मिळून हल्लेखोराला तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचा निकाल लागल्यानंतर मालवीने इन्स्टाग्रामवर देवाचे आभार मानणारी एक पोस्ट केली होती. वर दिसणारी तीच ही पोस्ट!  

16/17

malvimalhotra

सध्या मालवी या हल्ल्यातून सावकरुन पुन्हा अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये सक्रीय झाली आहे.  

17/17

malvimalhotra

मालवी इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असून आपल्या वेगवेगळ्या फोटोशूट आणि प्रोजेक्ट्सचे फोटो ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.