अविवाहित जोडप्यांना OYO हॉटेल मधून अटक होऊ शकते का ? काय आहे कायद्यात नमूद?

मागील काही दिवसांत OYO ने अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये राहण्यास मनाई केल्याची बातमी समोर आली. फक्त विवाहित जोडप्यांनाच हॉटेल मध्ये राहण्याची परवानगी असल्याच्या लोकांमध्ये चर्चा रंगत आहेत. अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेल्समध्ये थांबण्याचा नियम बदलला आहे का? नेमकं काय आहे कायद्यानुसार योग्य?

Jan 18, 2025, 16:58 PM IST

Couples hotel Stay: मागील काही दिवसांत OYO ने अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये राहण्यास मनाई केल्याची बातमी समोर आली. फक्त विवाहित जोडप्यांनाच हॉटेल मध्ये राहण्याची परवानगी असल्याच्या लोकांमध्ये चर्चा रंगत आहेत. अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेल्समध्ये थांबण्याचा नियम बदलला आहे का? नेमकं काय आहे कायद्यानुसार योग्य?

 

1/7

ओयो OYO ने एका ठिकाणी आपल्या चेक-इन पॉलिसीमध्ये बदल केले आहेत ज्यामुळे OYO सारख्या हॉटेलमध्ये अविवाहित जोडप्यांना थांबण्याच्या अधिकाराबद्दल अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेल्समध्ये थांबण्याचा नियम बदलला आहे का? नेमकं काय आहे कायद्यानुसार योग्य?  

2/7

संविधानात काय लिहिलं आहे?

भारतीय कायद्यानुसार व्यक्तीचे 18 वर्षे पूर्ण होणे हे प्रौढत्वाचे मानले जाते. 18 वर्षे पूर्ण असलेल्यांना कुठेही फिरण्याचा, वास्तव्याचा तसेच कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्याचा कायदेशीर अधिकार असतो. भारतीय संविधानातील कलम 21 मध्ये जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार सांगितला आहे. जर कोणतेही अविवाहित जोडपे हॉटेलमध्ये राहत असतील तर त्यांना कलम 21 अंतर्गत अटक केली जाऊ शकत नाही.   

3/7

अटक करण्याचा कायदेशीर आधार नाही

जर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला आणि तिथे प्रौढ म्हणजेच 18 वर्षे पूर्ण असलेले जोडपे हॉटेल मध्ये असतील त्यांच्यावर कोणत्याही गुन्हेगारी कृत्याशिवाय त्यांना अटक करता येत नाही. एका ऑनलाईन रिपोर्टनुसार, जर मुलगा आणि मुलगी हे एकमेकांच्या संमतीने हॉटेलमध्ये थांबले असतील तर पोलीस त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करु शकत नाहीत.   

4/7

ऐतिहासिक न्यायालयातील निर्णय

2019 मध्ये मद्रास हायकोर्टात अविवाहित जोडप्यांनी हॉटेल मध्ये थांबणं हे बेकायदेशीर नसल्याचं सिद्ध झालं आहे. जर प्रौढ व्यक्तींमधील लिव्ह-इन रिलेशनशिप गुन्हा नाही तर अविवाहित जोडप्याने  हॉटेलमध्ये राहणे हादेखील गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असे न्यायालात स्पष्ट झाले आहे.अशाच प्रकारचा निर्णय 2009 मध्ये दिल्ली हाय कोर्टाने तसेच 2013 मध्ये मद्रास हाय कोर्टाने दिला होता.   

5/7

हॉटेलमधील वातावरण आणि सामाजिक दडपण

सामाजिक दबावामुळे अनेक शहरांतील ओयो आणि इतर हॉटेल्स अविवाहित जोडप्यांना राहू देत नाहीत. अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये राहू न देणं हे कोणत्याही कायदेशीर नियमांतर्गत येत नाही. प्रौढ जोडप्यांना हॉटेलमध्ये राहण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं तज्ज्ञांनीही सांगितलं आहे.  

6/7

कायदेशीर संरक्षण

याबाबतीत प्रौढ जोडप्यांना आपल्या कायदेशीर अधिकारांबद्दल माहिती तसेच जाणीव असायला हवी. जर यासंदर्भात पोलीसांनी बेकायदेशीर हस्तक्षेप केला तर त्यावेळी शांत राहून कायद्याचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचं आहे. पौढत्वाचा पुरावा म्हणून ओळखपत्र दाखवणे आणि हॉटेल मध्ये दोघांचे आवश्यक दस्तावेज जमा करणे सुद्धा गरजेचं आहे.   

7/7

काय बदल केला पाहिजे?

या कायद्यामुळे प्रौढ जोडप्यांच्या हक्कांचे संरक्षण होत असले तरी, भारतीय समाजात अजूनही जुनी विचारसरणी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. समाजाने ही जुनी विचापसरणी सोडून प्रौढांच्या गोपनीयता आणि स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. असे केल्याने केवळ कायद्याचे पालनच नाही तर समाज विकसित होण्यास मदत होईल.