सलमानचा सल्ला फायदेशीर ठरला, आता 'ही' अभिनेत्री देतेय हिटवर हिट चित्रपट

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला सलमान खानने दिला होता सल्ला. आता देतेय हिटवर हिट चित्रपट. ओळखलं का? 

| Jan 18, 2025, 16:17 PM IST

सलमानचा सल्ला फायदेशीर ठरला, आता 'ही' अभिनेत्री देतेय हिटवर हिट चित्रपट | Salman Khan advised Kiara Advani to change her name

1/7

हिट चित्रपट

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांवर जास्त प्रभाव टाकू शकले नाहीत.

2/7

बॉलिवूड कलाकार

यामध्ये अक्षय कुमार, माधुरी दीक्षित यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीला देखील खूप संघर्ष करावा लागला. 

3/7

कियारा आडवाणी

कियारा आडवाणीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. हिंदी चित्रपटांसोबतच तिने साऊथ चित्रपटांमध्ये देखील तिने ठसा उमटवला आहे. 

4/7

पदार्पण

कियाराचे खरे नाव आलिया आडवाणी आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. तिने 2014 मध्ये  'फगली' चित्रपटातून पदार्पण केलं. 

5/7

प्रसिद्धी

कियाराला खरी ओळख 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटातून मिळाली. अभिनेत्रीचे सलमान खानसोबत खूप चांगले नाते आहे. 

6/7

सल्ला

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी सलमान खानने तिला तिचे नाव बदलून घेण्याचा सल्ला दिला होता. कारण त्यावेळी आलिया भट्टने ओळख निर्माण केली होती. 

7/7

गेम चेंजर

कियाराने 'कबीर सिंग', 'भूल भुलैया 2' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतीच ती साऊथ अभिनेता राम चरणसोबत 'गेम चेंजर'मध्ये दिसली होती.