'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपट पाहून आला आणि मार खाल्ला; Saif Ali Khan सोबत नक्की काय घडलं होतं?

Saif Ali Khan Birthday: सैफ अली खान हा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट हे गाजलेले आहेत त्यामुळे त्याची सदैव चर्चा होताना दिसते. सैफ अली खानचे पहिले लग्न हे अमृता सिंगसोबत झाले होते त्यानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर करीना कपूरशी सैफ अली खान लग्नबंधनात अडकला. सैफ अली खानही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

गायत्री हसबनीस | Aug 16, 2023, 08:00 AM IST

Saif Ali Khan Birthday: सैफ अली खान हा आपला सगळ्यात लोकप्रिय आणि आवडता कलाकार आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आज त्याचा वाढदिवस आहे आणि त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे परंतु तुम्हाला माहितीये का की सैफ अली खानला मारहाणही झाली होती. 

1/5

'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपट पाहून आला आणि मार खाल्ला; Saif Ali Khan सोबत नक्की काय घडलं होतं?

marathi news

सैफ अली खान हा आपल्या सगळ्यांचाच लाडका अभिनेता आहे. तो त्याच्या शांत आणि प्रांजळ स्वभावासाठी ओळखला जातो. त्यातून यावर्षी त्याचा 'आदिपुरूष' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट झाला नाही उलट प्रेक्षकांचा रोष अधिक मिळाला. सैफ अली खाननं यावेळी रावणाची भुमिका केली होती. 

2/5

'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपट पाहून आला आणि मार खाल्ला; Saif Ali Khan सोबत नक्की काय घडलं होतं?

viral

परंतु तुम्हाला माहितीये का सैफ अली खानसोबत एक दुर्दैवी प्रसंग घडला होता. त्यानं लेहेरेच्या मुलाखतीत याबद्दल सांहितले होते. तो म्हणाला की, मी 'मैं खिलाडी तू अनाडी' या चित्रपटाच्या प्रिमियरला गेलो होतो. तेव्हा दुर्दैवानं मी मार खाल्ला. झालं असं की मी आणि माझे काही मित्र हे एका नाईट क्लबमध्ये गेले होतो'' 

3/5

'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपट पाहून आला आणि मार खाल्ला; Saif Ali Khan सोबत नक्की काय घडलं होतं?

trending

''तेव्हा दोन मुली माझ्यासोबत आल्या आणि मग त्यांनी माझ्यासोबत डान्स करण्याचा हट्ट केला. परंतु मी त्यांना नकार दिला. त्या दोघीही त्यांच्या बॉयफ्रेंड्ससोबत झाल्या होत्या. मी त्या दोघींच्या बॉयफ्रेंड्सना सांगितलं की मला असं करण्याची इच्छा नाही. तुम्ही त्या दोघींनाही सांभाळावे. तेव्हा ते दोघंही चिडले आणि म्हणाले की आता तुझा हा सोन्यासारखा चेहरा खराब करतोय. आणि माझ्या चेहऱ्यावर जोरात पंच मारला.''

4/5

'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपट पाहून आला आणि मार खाल्ला; Saif Ali Khan सोबत नक्की काय घडलं होतं?

saif ali khan

अशी एक आठवण त्यानं सांगितली. त्या मुलींमधील एक मुलगी ही लोकप्रिय अभिनेत्री होती हे जेव्हा कळलं तेव्हा मात्र सैफ अली खाननं कुठलीच तक्रारही केली नव्हती. उलट त्याला कुठलाही ड्रामा नको होता. 

5/5

'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपट पाहून आला आणि मार खाल्ला; Saif Ali Khan सोबत नक्की काय घडलं होतं?

news

सैफ अली खानच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्याला चार मुलं आहे. करीना आणि त्याचे इटलीतले फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते.