1.4 कोटी ! नवी मुंबईतील DY Patil भारतातील सर्वात जास्त फी घेणारे मेडिकल कॉलेज

नवी मुंबईतील नेरुळ येथे असलेले डी वाय पाटील कॉलेज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या कॉलेजमधून मेडिकलची डिग्री मिळवण्यासाठी तब्बल 1.4 कोटींचा खर्च येतो.

| Aug 15, 2023, 18:55 PM IST

Navi Mumbai DY Patil  Medical College : नवी मुंबईतील नेरुळ येथे असलेले डी वाय पाटील हे कॉलेज भारतातील सर्वात जास्त फी घेणारे मेडिकल कॉलेज ठरले आहे. या कॉलेजमधून मेडिकलची डिग्री मिळवण्यासाठी विद्यार्थांना तब्बल 1.4 कोटी रुपये मोजावे लागतात.  डी वाय पाटील सह चेन्नई मध्ये असलेल्या आणखी दोन कॉलेजच्या समावेश या महागड्या कॉलेजच्या यादीत आहे. 

1/7

देशभरात अनेक  Deemed University आहे.  डी वाय पाटील हे देखील  Deemed University असलेले कॉलेज आहे. मेडिकलच्या डिग्रीसाठी 1.4 कोटींचा खर्च येत असल्याने हे देशातील सर्वात महागडे मेडिकल कॉलेज ठरले आहे. 

2/7

नवी मुंबईतील नेरुळ येथे डी वाय पाटील कॉलेजचे मोठं कॅम्पस आहे. येथील शिक्षणाचा दर्जा, मिळणाऱ्या सोई सुविधा तसेच विस्तीर्ण असे कॅम्पस. यामुळे येथून मेडिकलची डिग्री मिळवण्यासाठी अनेक विद्यार्थी प्रयत्न करत असतात.   

3/7

डी वाय पाटील कॉलेजमध्ये MBBS साठी वर्षाला 30.5 लाख इतके शुल्क आकारले जाते. यामुळे  MBBS ची डिग्री मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना   1.4 कोटींचा खर्च येतो. यात कॉलेज फी, ट्युशन फी, हॉस्टेल फी आदींचा समावेश आहे.   

4/7

डी वाय पाटील कॉलेजच्या पुणे येथील कॅम्पसमध्ये देखील MBBS साठी वार्षिक 29.55 लाख इतकी फी आकारली जाते.   

5/7

चेन्नई येथील श्री रामचंद्र मेडिकल कॉलेजची वार्षिक फी 28.13 लाख रुपये इतकी आहे. 

6/7

चेन्नईमधील एसआरएम मेडिकल कॉलेजमध्ये 27.2 लाख इतकी फी आकारली जाते. 

7/7

डी वाय पाटील कॉलेजसह पुण्यातील भारती विद्यापीठ येथे देखील मेडिकलच्या डिग्रीसाठी वर्षाला  26.8 लाख इतका खर्च येतो.