PHOTO: तुम्हाला निराशेने घेरलंय, सद्गुरुंची 'ही' 10 वचने तुम्हाला दाखवतील आशेचे किरण

Sadhguru Motivational Quotes in Marathi : तुम्हाला निराशेने चारही बाजूंनी घेरलं आहे? डोळ्यासमोर फक्त अंधार दिसतोय. अशावेळी सद्गुरु जग्गी वासुदेव यांची 10 वचने तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. जग्गी वासुदेव ज्यांना जगभरात 'सद्गुरु' म्हणून ओळखला जातं.सद्गुरु ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख आहेत.

 सद्गुरु आधुनिक आध्यात्मिक गुरु आहे. ज्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1957 साली कनार्टकातील मैसूर शहरात झाला होता. ध्यानासोबतच सद्गुरुंना लोकांनी जीवन कसे जगायचे हे देखील शिकवले.  आज त्यांच्या वाढदिवशी पाहूया 10 अशी वचने जे तुमचं संपूर्ण नशीबच पालटून टाकतील. 

1/10

जीवनात भीतीचं कारण आहे तुमचं जगणं. तुम्ही जीवनासोबत जगत नाही. तर तुम्ही तुमच्या मनात जगत आहात.

2/10

जीवन हा सर्वात मोठा गुरू आहे. तुमच्या भूतकाळातील कृती आणि घटनांमधून शिका आणि भविष्यात त्या चुकीची पुनरावृत्ती करू नका. तुम्हाला जीवनात नेहमी यश मिळेल.

3/10

जर तुम्ही बदलाला विरोध केला तर तुम्ही जीवनाचा प्रतिकार करता.

4/10

जेव्हा वेदना, राग किंवा दुःख असते तेव्हा आपल्या आजूबाजूला नव्हे तर स्वतःमध्ये पाहण्याची वेळ येते.

5/10

प्रेम ही गरज नसून इच्छा आहे. जेव्हा तुम्ही प्रेम करता तेव्हा तुम्ही स्थिर होतात आणि इतर कशाचीही गरज नसते.

6/10

जोपर्यंत तुम्हाला असे वाटते की, तुम्ही जसे आहात तसे कोणीतरी जबाबदार आहे, तोपर्यंत तुम्हाला जे व्हायचे आहे ते बनू शकत नाही.

7/10

तुमच्या भूतकाळापासून आणि वर्तमानातून शिका, जेणेकरून भविष्य चांगले बनवता येईल.

8/10

जर तुम्हाला आनंद हवा असेल तर आधी स्वतःमध्ये पहा.

9/10

अपयशाची जोखीम पत्करूनच यश मिळवता येते, म्हणून प्रयत्न करत राहा, यश नक्की मिळेल.

10/10

नेहमी तुमचे 100 टक्के देण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमचे सर्व काम सोपे होईल.