भारत-पाकिस्तानात लोकप्रिय असलेलं 'रूह अफज़ा'विषयी 'या' काही मजेशीर गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

आता उन्हाळा सुरु झाला असून आपल्या सगळ्या सतत काही ना काही थंड पिण्याची इच्छा होते. अशात आपण कुठे दुकानात गेल्यावर ज्युस घेतो. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की की रमजानचा महिना सुरु झाला की दक्षिण आशियात एक परंपरा आहे असं म्हणतात की काही सण किंवा थंड पिण्याची इच्छा झाली की अगोदर रुह अफ्जाला पसंती देतात. त्याचं कारण म्हणजे गुलाबाजा सुगंध आणि त्याची चव ही अनेकांना भावून जाते. अनेक वर्षांपासून म्हणता येईल किंवा हजारो वर्षांपासून म्हणता येईल गुबाचा ज्युस हा खूप लोकप्रिय आहे. 

| Apr 11, 2024, 18:22 PM IST
1/7

रूह अफज़ा

रूह अफज़ाचा इतिहास हा खूप जुना आहे. त्याची सुरुवात दिल्लीत झाली होती. त्याची सुरुवात ही हकीम हाफिज अब्दुल मजीद होते. 

2/7

काय करायचे हकीम हाफिज अब्दुल मजीद?

हकीम हाफिज अब्दुल मजीद यांना दिल्लीच्या यूनानी चिकित्सा पद्धतीविषयी खूप माहिती होती. त्यावेळी त्यांना उन्हाळ्यात होणाऱ्या उन्हाचा त्रास पाहता एक थंड पेय बनवण्याची इच्छा झाली. 

3/7

कसा बनवला ज्युस?

या विचारासोबत त्यांनी फळं, वन-औषधी आणि फुलांच्या अर्कापासून एक खास मिश्रण तयार केलं. त्यात गुलाब जल आणि पानाचा सुगंध टाकला. 

4/7

ज्युसचं नावं कसं आलं?

या सगळ्या मिश्रनाच्या ज्युसचा वास आणि चव पाहता त्यांनी त्याला 'रूह अफज़ा' हे नाव ठेवलं. याचा अर्थ आपल्या रुह म्हणजेच आत्म्याला तृप्त करणारं पेय. 

5/7

भारतात नाही तर इतर देशांमध्ये मिळाली लोकप्रियता?

फक्त भारताना नाही तर दक्षिण आशिया आणि परदेशातही लोकप्रियता मिळाली. हमदर्द लेबोरेटरीजच्या अधिकृत वेबसाईटनुसार, 1906 मध्ये हकीम हाफिज अब्दुल मजीदनं जुन्या दिल्लीच्या एका यूनानी क्लिनिक सुरु केलं. ज्याचं नाव 'हमदर्द' असं ठेवलं. 

6/7

तिथेच त्यांनी 'रूह अफज़ा' या सरबताची सुरुवात केली. भारत-पाकिस्तानं दोन देश झाल्यानंतरही रुह अफ्जा आजही दोन्ही देशात तितकाच लोकप्रिय आहे. 

7/7

राष्ट्रीय जनपद रेडियो (National Public Radio) नुसार, हाफिज अब्दुल मजीद यांच्या निधनानंतर पत्नी आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा व्यापर सांभाळला. 1947 मध्ये जेव्हा विभाजन झाले तेव्हा त्यांचा एक मुलगा दिल्लीतच राहिला, तर दुसरा मुलगा पाकिस्तानला गेला. त्यांनी दोन वेगवेगळ्या नावाच्या कंपनी सुरु केल्या आणि व्यवसाय पुढे वाढवला.