Jio चा बहुप्रतीक्षित लॅपटॉप लाँच; किंमत आहे स्मार्टफोनपेक्षा कमी

अनेकजण JioBook  लॅपटॉप कधी लाँच होईल याच्या प्रतीक्षेत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून JioBook  लॅपटॉप मार्केटमध्ये लाँच झाला आहे.

Jul 31, 2023, 18:29 PM IST

JioBook Launched: Jio मोबाईलनंतर आता Jio चा लॅपटॉप मार्केटमध्ये धुमाकीळ घालणार आहे. Jio चा बहुप्रतीक्षित लॅपटॉप अखेर लाँच झाला आहे. दरमदार बॅटरी बॅकअप असलेल्या या JioBook  लॅपटॉपची किंमत 20 हजारांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या JioBook  लॅपटॉपचे फिचर्स. तसेच, JioBook  लॅपटॉप कुठे खरेदी करता येईल. 

1/9

JioBook लॅपटॉपची पहिली आवृत्ती ऑक्टोबर 2022 मध्ये लाँच झाली होती. यानंतर वर्षभरात याचे दुसरे एडिशन लाँच जाले आहे. 

2/9

JioBook लॅपटॉप ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. याची किंमत 16,499 रुपये इतकी आहे. 

3/9

4GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमरी आहे. 256GB पर्यंत स्टोरेज वाढवता येवू शकते. 

4/9

5,000mAh चा बॅटरी बॅकअप आहे. एकदा चार्ज केल्यावर हा लॅपटॉप तब्बल 8 तासांचा बॅटरी बॅकअप देईल असा दावा Jio कंपनीने केला आहे.    

5/9

JioPages ब्राउझरवरून यात इंटरनेट सर्फिंग करता येणार आहे. तसेच यामध्ये वेगवेगळ्या App install करण्यासाठी JioStore देखील आहे. 

6/9

JioOS या नवीन  ऑपरेटिंग सिस्टमवर JioBook काम करणार आहे. यात 4G कनेक्टिव्हिटी देखील आहे.  

7/9

या लॅपटॉपमध्ये क्वालकॉम ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे.  वाय-फाय तसेच ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटीसाठी सपोर्ट देखील आहे. 

8/9

JioBook लॅपटॉप वजनाला खूपच हलका आहे.  वजन फक्त 990 ग्रॅम आहे. यामुळे अगदी सहज हा लॅपटॉप कॅरी करता येईल. 

9/9

पहिला लॅपटॉप लाँच केल्यानंतर परवडणाऱ्या किंमतीत JioBook उपलब्ध करुन देण्याची घोषणा कंपनीनी केली होती.