मी पैसे खाल्लेयत, कसे परत करु? 21 व्या वयात 75 सिनेमा साइन केलेल्या गोविंदावर का आली होती अशी वेळ?

गोविंदा बॉलिवूड इंडस्ट्रीचा एकमेव स्टार आहे,ज्याला डेब्युनंतर बॅकटूबॅक लगेच 75 सिनेमांची ऑफर मिळाली.

| Oct 01, 2024, 17:28 PM IST

Govinda Career: गोविंदा बॉलिवूड इंडस्ट्रीचा एकमेव स्टार आहे,ज्याला डेब्युनंतर बॅकटूबॅक लगेच 75 सिनेमांची ऑफर मिळाली.

1/8

मी पैसे खाल्लेयत, कसे परत करु? 21 व्या वयात 75 सिनेमा साइन केलेल्या गोविंदावर का आली होती अशी वेळ?

govinda ruined his career dilip kumar Guide Marathi News

Govinda Career: नव्वदीच्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये गोविंदाचं नाण वाजायचं. त्याचे सिनेमा बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करायचे. त्यावेळी गोविंदाच्या स्टारडमसमोर मोठमोठे स्टार फिके पडायचे. बॉलिवूड डेब्यूनंतर गोविंदाने 6 डझन सिनेमा साइन केल्या होत्या. पण तरीही तो खूप त्रस्त होता.

2/8

डेब्युनंतर बॅकटूबॅक सिनेमा

गोविंदा बॉलिवूड इंडस्ट्रीचा एकमेव स्टार आहे,ज्याला डेब्युनंतर बॅकटूबॅक लगेच 75 सिनेमांची ऑफर मिळाली. पण सलग काम केल्याने गोविंदाची हालत खूप खराब व्हायला लागली होती. तेव्हा दिलीप कुमार यांनी गोविंदाला काही सिनेमा न करण्याचा सल्ला दिला होता.

3/8

बॉलिवूडने मला निवडलं

काही दिवसांपुर्वी मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये गोविंदाने आपल्या करिअरबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या. त्यावेळी दिलीप कुमार यांनी दिलेला सल्ला सांगितला. मी बॉलिवूडमध्ये स्वत: आलो नव्हतो तर बॉलिवूडने मला निवडलं होतं, असे गोविंदाने सांगितले.

4/8

21 व्या वर्षी 75 सिनेमा साइन

गोविंदा म्हणतो, डेब्युच्यानंतर वयाच्या 21 व्या वर्षी मी 75 सिनेमा साइन केले होते. मी फिल्ममध्ये आलो नव्हतो तर माझ्या हाती देवाकडून फिल्म लाइन देण्यात आली होती आणि हे संभाळ असं सांगितलं होतं.

5/8

25 सिनेमा

दिलीप कुमार साहेबांची माझ्यावर कृपा राहिली. यातील 25 सिनेमा करु नको, असा सल्ला त्यांनी आपल्याला दिला होता, असे गोविंदाने सांगितले.

6/8

मी पैसे खाल्ले आहेत. परत कसे करु?

त्यावेळी दिलीप कुमार यांना उत्तर देताना गोविंदा म्हणाला, मी पैसे खाल्ले आहेत. परत कसे करु? यानंतर दिलीप कुमार यांनी त्याला हिम्मत दिली. देवाच्या कृपेने सारंकाही ठिक होईल. तू सोप्या रितीने सर्वांना साइनिंग अमाऊंट देशील, असे ते गोविंदाला म्हणाले.

7/8

15 दिवस झोपलो नाही

माझ्याकडे खूप काम होते. मी सेटवर आजारी पडू लागलो होतो,असे दिलीप कुमार यांनी सांगितले होते. त्यावर गोविंदा म्हणाला मी 15 दिवस झोपलो नाहीय. मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. यानंतर गोविदाने दिलीप कुमार यांचा सल्ला ऐकला.

8/8

इज्जतदार नावाच्या सिनेमात एकत्र काम

गोविंदा आणि दिलीप कुमार यांनी इज्जतदार नावाच्या सिनेमात काम केले होते. जो सिनेमा 1990 मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये माधुरी दीक्षित आणि अनुपम खेर सारखी स्टारकास्ट होती. गोविंदाचा शेवटचा सिनेमा रंगीला राजा (2019) होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. यानंतर तो मोठ्या पडद्यापासून दूर झाला.