धुम्रपान न करणाऱ्यांमध्येही वाढतोय फुफ्फुसाचा कर्करोग; लक्षणे,उपाय वेळीच जाणून घ्या

सध्या धुम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान होत असल्याचे समोर येत आहे. यामागे प्रदुषण आणि दुषित रसायने कारणीभूत ठरत आहेत. श्वास घेण्यास त्रास होणे, ताप येणे, तीव्र खोकला आणि कफ ही या आजाराची लक्षणं आहेत. परंत, या सामान्य लक्षणांकडे लोक दुर्लक्ष करत असल्याने कर्करोग बळावतोय. भारतीय पुरूषांमध्ये तोंडाच्या कॅन्सरनंतर फुफ्फुसाच्या कॅन्सरची संख्या जास्त आहे. हेच प्रमाण स्त्रिया चौथ्या क्रमांकावर आहे.

| Jul 31, 2023, 17:23 PM IST

World Lung Cancer Day: सध्या धुम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान होत असल्याचे समोर येत आहे. यामागे प्रदुषण आणि दुषित रसायने कारणीभूत ठरत आहेत. श्वास घेण्यास त्रास होणे, ताप येणे, तीव्र खोकला आणि कफ ही या आजाराची लक्षणं आहेत. परंत, या सामान्य लक्षणांकडे लोक दुर्लक्ष करत असल्याने कर्करोग बळावतोय. भारतीय पुरूषांमध्ये तोंडाच्या कॅन्सरनंतर फुफ्फुसाच्या कॅन्सरची संख्या जास्त आहे. हेच प्रमाण स्त्रिया चौथ्या क्रमांकावर आहे.

1/7

धुम्रपान न करणाऱ्यांमध्येही वाढतोय फुफ्फुसाचा कर्करोग; कारण, लक्षणे वेळीच जाणून घ्या

World Lung Cancer Day rise even among non smokers know Reasons symptoms

World Lung Cancer Day: 1 ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुस दिन म्हणून पाळला जातो. फुफ्फुसाचा कर्करोग हा जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. सध्या, फुफ्फुसाच्या कर्करुग्णांची संख्या वेगाने वाढतेय. धुम्रपान करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होते, असे म्हटलं जाते. परंत, सध्या धुम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान होत असल्याचे समोर येत आहे. 

2/7

प्रदुषण आणि दुषित रसायने

World Lung Cancer Day rise even among non smokers know Reasons symptoms

यामागे प्रदुषण आणि दुषित रसायने कारणीभूत ठरत आहेत. श्वास घेण्यास त्रास होणे, ताप येणे, तीव्र खोकला आणि कफ ही या आजाराची लक्षणं आहेत. परंतु, या सामान्य लक्षणांकडे लोक दुर्लक्ष करत असल्याने कर्करोग बळावतोय. भारतीय पुरूषांमध्ये तोंडाच्या कॅन्सरनंतर फुफ्फुसाच्या कॅन्सरची संख्या जास्त आहे. हेच प्रमाण स्त्रिया चौथ्या क्रमांकावर आहे.

3/7

पहिला, दुसरा टप्पा

World Lung Cancer Day rise even among non smokers know Reasons symptoms

पहिल्या टप्प्यात हा कर्करोग फुफ्फुसांमध्ये आढळतो परंतु शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात उपचार केल्याने रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. दुसऱ्या टप्प्यात, लिम्फ नोड्ससह फुफ्फुसांमध्ये हा कर्करोग पसरल्याचे दिसून येतो, अशी माहिती झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुंदराम पिल्लई यांनी दिली.

4/7

स्टेज 3

World Lung Cancer Day rise even among non smokers know Reasons symptoms

स्टेज 3 मध्ये, फुफ्फुसात आणि छातीच्या मध्यभागी लिम्फ नोड्समध्ये कर्करोग असतो. चौथ्या टप्प्यामध्ये, कर्करोग फुफ्फुसात आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. वेळीच निदान फुफ्फुसाच्या कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी रूग्णाचा जीव वाचू शकतो. 

5/7

सायलेंट किलर

World Lung Cancer Day rise even among non smokers know Reasons symptoms

फुफ्फुसाचा कर्करोग हा एक सायलेंट किलर आहे. कारण फुफ्फुसाच्या कर्करोगाची सुरुवातीच्या टप्प्यात क्वचितच लक्षणे आढळतात आणि रोग वाढल्यानंतर लक्षणे दिसू लागतात. खोकताना रक्त येणे, धाप लागणे, छातीत दुखणे, अनपेक्षित वजन कमी होणे, हाडे दुखणे ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची काही लक्षणं आहेत, असे मेडिकवर रूग्णालय सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शिशिर शेट्टी सांगतात.

6/7

धूम्रपान करणाऱ्या लोकांपासून दूर

World Lung Cancer Day rise even among non smokers know Reasons symptoms

तुम्ही धूम्रपान करत नाही परंतु सिगारेटच्या धुराच्या संपर्कात असाल तर तुम्हाला फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका सर्वांधिक असतो. त्यामुळे केवळ धूम्रपान न करणे महत्त्वाचे नाही, तर आपल्या आजूबाजूला धूम्रपान करणाऱ्या लोकांपासून दूर राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

7/7

नियमित व्यायाम

World Lung Cancer Day rise even among non smokers know Reasons symptoms

म्हणूनच फुफ्फुसाच्या कर्करोगापासून स्वतःला दूर ठेवायचं असेल तर नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणे गरजेचं आहे. दररोज आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश केल्यास फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो.